'12th Fail' पाहून अल्लू अर्जुनचा भाऊ झाला भावूक; म्हणाला- 'वडिलांची एक गोष्ट आठवली...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 07:16 PM2024-02-11T19:16:42+5:302024-02-11T19:18:33+5:30

विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित 12th Fail चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.

Allu Arjun's brother Allu Sirish gets emotional after seeing '12th Fail' movie | '12th Fail' पाहून अल्लू अर्जुनचा भाऊ झाला भावूक; म्हणाला- 'वडिलांची एक गोष्ट आठवली...'

'12th Fail' पाहून अल्लू अर्जुनचा भाऊ झाला भावूक; म्हणाला- 'वडिलांची एक गोष्ट आठवली...'

12th Fail Movie: दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा 12th Fail चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. मुख्य भूमिकेत असलेल्या विक्रांत मेसीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक मोठ्या स्टार्सनी या चित्रपटाचे कौतुक केले. आता साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा भाऊ आणि अभिनेता अल्लू शिरिश यानेही या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता अल्लू सिरिशने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले, “थोडा उशीर झाला, पण आताच 12th Fail चित्रपट पाहिला. चित्रपटाचा शेवट पाहून माझे डोळे पाणावले. चित्रपटात विक्रांत मेसी, मेधा शंकर आणि इतर सर्व कलाकारांनी आपापली पात्रे जगली आहेत. तुम्हा सर्वांना सलाम.”

पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटले की, “मास्टर विधू विनोद चोप्राजी यांनी हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतल्याने मला खूप आनंद होत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर वडिलांनी सांगितलेली गोष्टी आठवली. जेव्हा मी कॉलेजमध्ये पत्रकारिता शिकत होतो, माझे वडील मला सांगायचे की, नेते आपल्यावर राज्य करतात, पण देशाचे आणि यंत्रणेचे दैनंदिन काम हे नोकरशहाच करतात. मला त्यांची ही कथा पडद्यावर पाहून खुप आनंद झाला आहे.”

IPS मनोज कुमार शर्मा यांची कहाणी
12th Fail चित्रपट IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. मनोज शर्मा यांची भूमिका विक्रांत मेसीने साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. रिपोर्ट्सनुसार, सुमारे 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 70.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर धमाल केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवरही उपलब्ध आहे. Disney Plus Hotstar वर हा चित्रपट पाहू शकता.

Web Title: Allu Arjun's brother Allu Sirish gets emotional after seeing '12th Fail' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.