‘पुष्पा’ चित्रपटात अल्लु अर्जुनचा अॅक्शन अवतार; एका सीनसाठी ६ मिनिटांत खर्च होणार ६ कोटी!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 19:34 IST2020-05-10T19:33:56+5:302020-05-10T19:34:23+5:30
अभिनेता अल्लू अर्जुनने त्याच्या वाढदिवसादिवशी या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट तमिळसोबतच हिंदीसहित अजून पाच भाषांत तयार होत आहे. निर्मातेमंडळी या चित्रपटाला मोठया प्रमाणात प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत.

‘पुष्पा’ चित्रपटात अल्लु अर्जुनचा अॅक्शन अवतार; एका सीनसाठी ६ मिनिटांत खर्च होणार ६ कोटी!!
साऊथचा मेगास्टार अल्लु अर्जुन याचा चित्रपट ‘पुष्पा’ गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट अॅक्शनपट असून यात अल्लू अर्जुन अॅक्शन लूकमध्ये दिसणार आहे. यासोबतच आता अजून बाब या चर्चेसोबत जोडली गेली आहे. ती म्हणजे, चित्रपटात एक ६ मिनिटांचा सीन असणार आहे. या सीनसाठी तब्बल ६ कोटी रूपये निर्माते खर्च करणार असल्याचे समजतेय. हा चित्रपट ‘मेक इन इंडिया’वर आधारित आहे, या चित्रपटाचा उद्देश कामगारांमध्ये रोजगारनिर्मिती करण्याचा असल्याचे सांगण्यात आले आहे.
अभिनेता अल्लू अर्जुनने त्याच्या वाढदिवसादिवशी या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट तमिळसोबतच हिंदीसहित अजून पाच भाषांत तयार होत आहे. निर्मातेमंडळी या चित्रपटाला मोठया प्रमाणात प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. अल्लूच्या वाढदिवसादिवशी या चित्रपटाचे वेगवेगळया भाषांमधील पोस्टर्स देखील लाँच करण्यात आले होते. पोस्टरवरूनच कळत होते की, हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या करिअरमधील बिग बजेट चित्रपटांपैकी एक असणार आहे. या चित्रपटातील काही सीन्समधील फोटो आऊट झाले आहेत. यातही अल्लू अर्जुन अॅक्शन अवतारात दिसत आहे. अल्लूचे चाहते त्याला या गेटअपमध्ये खूप पसंत करतात.
अल्लू अर्जुनने या चित्रपटाचे पोस्टर पोस्ट करत म्हटले होते की,‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकूमार गुरू करणार आहेत. त्यांनी हे देखील सांगितले होते की, हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडेल. ‘पुष्पा’ मध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल.