अलीला सुपरवूमन लिली सिंहच्या रुपात सापडली नवी मैत्रिण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2017 17:19 IST2017-04-13T11:49:47+5:302017-04-13T17:19:47+5:30
हे वर्ष अली फजलसाठी अत्यंत यशस्वी ठरले आहे. अलीला फोकस फीचर्ज आणि बीबीसी फिल्मस गेल्यावर्षी अलीला विक्टोरिया आणि अब्दुल ...

अलीला सुपरवूमन लिली सिंहच्या रुपात सापडली नवी मैत्रिण
ह वर्ष अली फजलसाठी अत्यंत यशस्वी ठरले आहे. अलीला फोकस फीचर्ज आणि बीबीसी फिल्मस गेल्यावर्षी अलीला विक्टोरिया आणि अब्दुल या चित्रपटात जूडी डेंचच्या विरुद्ध भूमिकेसाठी घेतले आहे. आम्हाला असे कळले आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी अलीने लॉस एंजेल्समध्ये होता तिकडे त्यांनी काही नव्या दिग्दर्शकांची भेट घेतली आणि हॉलिवूडमध्ये आपल्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगलादेखील सुरुवात केली. आपल्या व्यस्त शेड्यूलमधूने वेळ काढत अलीने युट्यूबची सुपरवूमन नावानी ओळखली जाणारी लिली सिंहची हिच्यासोबत छान वेळ घालवला. लिली सिंगने नुकतेच तिचे 'हाऊ टू बी अ बावसे' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. अली आणि लिलीची एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली होती आणि तिथेच त्यांची घट्ट मैत्री झाली. लिली सिंहच्या पुस्तक प्रकाशनला आमंत्रित केल्या गेलेल्या पाहुण्यांच्या यादीत अली हा एकमेव बॉलिवूडचा कलाकार होता. यादरम्यान दोघांनी बॉलिवूडमधल्या चित्रपटांबद्दल चर्चा केली. लवकरच दोघे एकत्र काम करणार असल्याचेही समजते आहे. सध्या अली सप्टेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या त्याच्या विक्टोरिया आणि अब्दुल याचित्रपटांचे शूटिंग पूर्ण करतो आहे. अली सांगतो, मी लिलीला हाऊ टू बी अ बावसे या तिच्या प्रकाशना सोहळ्यादरम्यान भेटलो होतो. माणूस म्हणून ती खूप सुंदर आहे. आम्ही दोघांनी तिच्या पुस्तकाबदल आणि त्या कार्यक्रमाबाबत चर्चा केली. माझ्यासाठी ही परीक्षेची वेळ होती सेल्फी बूथवर गिफ्ट्स तयार केले आणि कोणालाही याची कानोकान खबर लागू नये याची आम्ही विशेष खबरदारी घेतली. त्यामुळे आमचा वेळ आम्ही शांतते आणि मस्तीमध्ये घालवू शकलो.