​अयानच्या पुढच्या सिनेमात आलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 14:04 IST2016-07-29T08:32:37+5:302016-07-29T14:04:45+5:30

अखेर अयान मुखर्जीच्या आगामी चित्रपटाची हीरोईन कोण यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या सुपरहीरो चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर कपूर व आलिया ...

Alia in the next film of Ayan | ​अयानच्या पुढच्या सिनेमात आलिया

​अयानच्या पुढच्या सिनेमात आलिया

ong>अखेर अयान मुखर्जीच्या आगामी चित्रपटाची हीरोईन कोण यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या सुपरहीरो चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर कपूर व आलिया भट मोठ्या पडद्यावर प्रथमच एकत्र दिसणार आहेत.

आलियाने वेळोवेळी रणबीरसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ह्यहायवेह्णच्या प्रोमोशनवेळी रणबीरनेसुद्धा इम्तियाज अलीला आलियासोबत कास्ट करण्याची विनंती केली होती. इम्तियाज तर नाही पण अयानच्या तात्पुरत 'ड्रॅगन' नाव असलेल्या या चित्रपटात ही फ्रेश जोडी पहायला मिळणार.

या महिन्याच्या सुरूवातील अयान, रणबीर आणि आलियाने लंडनमध्ये भेटून चित्रपटाच्या कथेवर चर्चा केली. त्यानंतर आलियाचे नाव जवळपास निश्चित झाले होते. तिने स्वत: या बातमीला दुजोरा दिला असून वर्षाअखेर शुटींगला सुरूवात करणार असल्याचे सांगितले.

'वेक अप सिड!' आणि'ये जवानी है दीवानी' नंतर अयान-रणबीर या दिग्दर्शक-अभिनेत्या जोडीच्या तिसऱ्या चित्रपटात रणबीरकडे आग निर्माण करण्याची सुपरपॉवर असेल अशी चर्चा आहे.

Web Title: Alia in the next film of Ayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.