आलिया भटची बहीण शाहीन दिसली मिस्ट्री मॅनसोबत, युजर्स म्हणाले - "हा अयान मुखर्जी आहे का?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:35 IST2025-01-07T10:34:01+5:302025-01-07T10:35:32+5:30
Alia Bhatt And Shaheen Bhatt : आलिया भटच्या बहिणीच्या व्हेकेशनचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे.

आलिया भटची बहीण शाहीन दिसली मिस्ट्री मॅनसोबत, युजर्स म्हणाले - "हा अयान मुखर्जी आहे का?"
आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor)ने कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरे केले. त्यांनी थायलंडमध्ये नवीन वर्ष साजरे केले. यावेळी आलिया भटची बहीण शाहीन भट(Shaheen Bhatt)ही तिच्यासोबत होती. शाहीनने या व्हेकेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती आई आणि बहिणीसोबत पोज देताना दिसली. याशिवाय तिने एक ग्रुप फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनी राजदान, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, अयान मुखर्जी यांसारखे स्टार्सही दिसले.
शाहीनने सुट्टीचा खूप आनंद लुटला. फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यांनी एक लांबलचक कॅप्शनही लिहिले आहे. शाहीनचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत शाहीन एका मिस्ट्री मॅनसोबत समुद्राचा आनंद घेताना दिसत आहे. फोटोत दोघांचे चेहरे दिसत नसून दोघांनी काळा चष्मा घातला आहे आणि मिस्ट्री मॅनने पांढरा शर्ट घातला आहे.
शाहीनचा हा फोटो पाहून लोक अंदाज लावत आहेत की ती अयान मुखर्जीला डेट करत आहे. एका युजरने लिहिले की, शाहीन, तुला आणि अयानला एकत्र पाहून आनंद झाला. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. अखेर शाहीनलाही तिच्या आनंदात वाटा मिळाला. दुसऱ्या युजरने विचारले की शेवटच्या फोटोत कोण आहे? एका यूजरने लिहिले, हे शाहीन आणि अयान मुखर्जी आहेत का? अशाच अनेक कमेंट्स या फोटोवर पाहायला मिळत आहेत. हा मिस्ट्री मॅन कोण आहे, याबाबत शाहीनने स्वत: काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अयान आणि रणबीर आहेत चांगले मित्र
अयान मुखर्जीबद्दल बोलायचे तर तो रणबीर कपूरचा खूप चांगला मित्र आहे. अयानने रणबीरसोबत 'वेक अप सिड', 'ये जवानी है दिवानी' आणि 'ब्रह्मास्त्र' सिनेमे बनवले. हे तिन्ही चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले.