आलिया भट्टच्या या बॅगची किंमत वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 15:27 IST2018-08-06T14:47:14+5:302018-08-06T15:27:43+5:30

आलिया ब्लॅक लूकमध्ये बाहेर येताना दिसली. पण सर्वांची नजर तिच्या जवळ असलेल्या लाल बॅगवर गेली. तेव्हापासून ही बॅग चर्चेचा विषय ठरली आहे. 

Alia Bhatt's bags cost will shock you | आलिया भट्टच्या या बॅगची किंमत वाचून व्हाल थक्क!

आलिया भट्टच्या या बॅगची किंमत वाचून व्हाल थक्क!

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट ही तिच्या आगामी 'ब्रम्हास्त्र' या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. गेल्याच आठवड्यात आलिया भट्ट या सिनेमांचं शेड्यूल पूर्ण करुन भारतात परतली आहे. दरम्यान एअरपोर्टवर ती स्पॉट झाली होती. आलिया ब्लॅक लूकमध्ये बाहेर येताना दिसली. पण सर्वांची नजर तिच्या जवळ असलेल्या लाल बॅगवर गेली. तेव्हापासून ही बॅग चर्चेचा विषय ठरली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, आलियाकडे असलेल्या या बॅगची किंमत एका सर्वसामान्य भारतीयाच्या पगारापेक्षाही जास्त आहे. या बॅगची किंमत ६६० अमेरिकन डॉलर इतकी आहे. म्हणजे भारतीय करन्सीनुसार ही किंमत ४५००० रुपये इतकी आहे. आलियाची ही बॅग लक्झरी ब्रॅन्ड Balenciaga ची आहे. 

आलियासोबत एअरपोर्टवर अभिनेत्री डिंपल कपाडिया सुद्धा दिसली. 'ब्रम्हास्त्र' या सिनेमात आलियासोबतच रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत आहेत. 

दरम्यान, या सिनेमाचं शूटिंग सुरु झाल्यापासून आलिया आणि रणबीर यांच्या अफेअरची चर्चाही चांगलीच रंगली आहे. इतकेच नाही तर आलिया आणि रणबीर दोघांनीही आपल्या या नात्याबाबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वक्तव्य केलंय. इतकेच नाही तर दोघांच्या लग्नाचीही चर्चाही आता होतीये.

Web Title: Alia Bhatt's bags cost will shock you