यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये झळकणार आलिया भट, शूटिंगला या दिवशी होणार सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 21:16 IST2024-03-05T21:15:51+5:302024-03-05T21:16:28+5:30
Alia Bhatt : आलिया भट अभिनेत्री शर्वरी वाघसोबत या अनटाइटल्ड चित्रपटात काम करणार आहे. ते ॲक्शन एंटरटेनरमध्ये सुपर-एजंट असतील!

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये झळकणार आलिया भट, शूटिंगला या दिवशी होणार सुरूवात
ब्लॉकबस्टर यशराज फिल्म्स(YRF)च्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलिया भट (Alia Bhatt) सामील होण्याविषयीच्या अटकळ आता जवळपास ६ महिन्यांपासून चर्चेत आहेत, यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनी FICCI फ्रेम्स येथे या चर्चेला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आलियासोबत अभिनेत्री शर्वरी वाघही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
यशराज फिल्ममधील स्पाय युनिव्हर्स मधील एक नवीन घडामोडीवर अक्षय म्हणाला, “मी इंडस्ट्रीतील सर्वात मोठ गुप्त गुपित शेअर करेन, म्हणजे आलिया भट एका स्पाय युनिव्हर्स चित्रपटाचे नेतृत्व करत आहे आणि शेड्यूल या वर्षाच्या शेवटी सुरू होईल. पण तुम्हाला माहीत आहे की, या स्पाय यूनिवर्स बद्दल बोलताना, स्टुडिओमध्ये हा IP मिळाल्याबद्दल आम्ही खरोखर खूप रोमांचित आणि उत्साहित आहोत.
तो पुढे म्हणतो, “मला वाटते की YRF स्पाय युनिव्हर्स एक आर्थिक आणि सांस्कृतिक जुगलबंदी आहे. आणि सर्वात मौल्यवान आयपींपैकी एक म्हणून, आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो. त्यामुळे स्पाय युनिव्हर्सवर बरेच काही येणार आहे, त्या अंतर्गत अधिकाधिक चित्रपट बनत असल्याचे तुम्ही पहाल. पण अर्थातच, सर्वकाही येथे शेअर करणार नाही. परंतु आम्ही याबद्दल अधिक योग्य वेळी बोलू. पण सध्या मी एवढेच म्हणू शकतो की आलिया भट एका स्पाय युनिव्हर्स चित्रपटाचे नेतृत्व करत आहे.”
आलिया भट अभिनेत्री शर्वरी वाघसोबत या अनटाइटल्ड चित्रपटात काम करणार आहे. ते ॲक्शन एंटरटेनरमध्ये सुपर-एजंट असतील!