'गंगूबाई'च्या शूटिंगच्या आधीच आलिया भट करतेय आराम, जाणून घ्या यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:46 IST2020-01-21T13:45:47+5:302020-01-21T13:46:28+5:30
अभिनेत्री आलिया भट आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीमुळे खूप चर्चेत आहे.

'गंगूबाई'च्या शूटिंगच्या आधीच आलिया भट करतेय आराम, जाणून घ्या यामागचं कारण
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीमुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत आहेत. या चित्रपटाचे दोन पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत आणि चित्रपटाबाबत चाहते खूप उत्सुक आहेत. चित्रपटाच्या कामाला सुरूवात झाली आहे परंतु यादरम्यान वृत्त आले की आलिया भटच्या जुन्या दुखापतीमुळे सध्या ती आराम करत आहे.
स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, आलिया भटच्या पाठीला दुखापत झाली असून तिने घरी राहून आराम करण्याचा निर्णय घेतला. मात्र आलियाच्या नुकत्याच आलेल्या स्टेटमेंटनुसार तिला ही दुखापत आता झालेली नसून आधी झालेली होती. मात्र आता त्रास होत असल्यामुळे सध्या तिने आराम करण्याचा निर्णय घेतला आहे.
आलियाच्या इंस्टाग्राम अकाउंट पाहिल्यावर लक्षात येत आहे की, तिने शेवटचे गंगूबाई चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते आणि स्टेटसच्या माध्यमातून तिने तिच्या मांजरीचे फोटो शेअर केले आहेत.
आलिया भटच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती ब्रह्मास्त्रमध्येरणबीर कपूरसोबत झळकणार आहे. पहिल्यांदाच ती रणबीर कपूरसोबत काम करते आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे.
या चित्रपटात रणबीर कपूर वेगळ्या अंदाजात पहायला मिळणार आहे. या चित्रपटात आलिया व रणबीर शिवाय अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.