Latest Photoshoot :आलिया भटच्या या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:18 PM2019-04-03T13:18:29+5:302019-04-03T13:18:58+5:30

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारावर नाव कोरणारी आलिया सध्या यशाच्या अत्त्युच्च शिखरावर आहे. तूर्तास आलिया तिच्या एका नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे

Alia Bhatt is a star reborn in her latest photoshoot and interview for Grazia India | Latest Photoshoot :आलिया भटच्या या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा!

Latest Photoshoot :आलिया भटच्या या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा!

googlenewsNext
ठळक मुद्देतूर्तास आलिया  चित्रपटांसोबतच तिच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत आहे. रणबीर कपूर व आलिया लवकरच लग्न करणार असे मानले जात आहे. 

बॉलिवूडच्या यंग जनरेशनची सर्वाधित गुणी अभिनेत्री कोण, तर आलिया भट. याबद्दल कुणाचेही दुमत असता कामा नये.  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारावर नाव कोरणारी आलिया सध्या यशाच्या अत्त्युच्च शिखरावर आहे. तूर्तास आलिया तिच्या एका नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या फोटोशूटमधील आलियाची एक एक अदा तुम्हाला खल्लास केल्याशिवाय राहणार नाही. फोटोशूटमधील साडीतील आलिया लूक तर पाहण्यासारखा आहे.


आलियाने स्वत: या स्टनिंग आणि सेक्सी फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. Grazia India’ या मॅगझिनसाठी आलियाने हे फोटोशूट केले आहे. साईड पार्टिंगसोबत आलियाचे मानेवर रूळणारे ओले केस तिच्या फोटोंना आणखी सुंदर बनवत आहेत. हे फोटो पाहून कुणीही आलियाच्या प्रेमात पडेल, इतके ते सुंदर आहेत. तेव्हा आलियाचे हे सुंदर फोटो तुम्हीही पाहा आणि कसे वाटते ते आम्हाला नक्की सांगा.


आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तिचा ‘कलंक’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. या चित्रपटात पुन्हा एकदा वरूण धवन व आलियाची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

 ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातही आलिया झळकणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात आलिया पहिल्यांदा तिचा बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. याशिवाय संजय लीला भन्साळींचा ‘इंशाअल्लाह’ आणि एस. एस. राजमौली यांचा ‘आरआरआर’ या चित्रपटातही आलिया मुख्य भूमिकेत आहे. तूर्तास आलिया  चित्रपटांसोबतच तिच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत आहे. रणबीर कपूर व आलिया लवकरच लग्न करणार असे मानले जात आहे. 

Web Title: Alia Bhatt is a star reborn in her latest photoshoot and interview for Grazia India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.