आलियाने पती रणबीर कपूरवर ठेवली होती पाळत? कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 14:04 IST2024-09-22T14:03:55+5:302024-09-22T14:04:26+5:30

जिगरा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया कपिलच्या शोमध्ये पोहचली होती.

Alia Bhatt Spies on Husband Ranbir Kapoor? Jigra Stars Alia Bhatt reveals in Kapil Sharma's show | आलियाने पती रणबीर कपूरवर ठेवली होती पाळत? कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा

आलियाने पती रणबीर कपूरवर ठेवली होती पाळत? कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा

'द ग्रेट  इंडियन कपिल शो'चा दुसरा सीजन काल 21 सप्टेंबरपासून सुरु झाला आहे. नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणाऱ्या या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेत्री आलिया भट आणि दिग्दर्शक करण जोहरने हजेरी लावली. कपिल शर्मा आणि त्याच्या टीमबरोबर आलिया आणि करणने खूप धमाल केली. यावेळी तिने रणबीरविषयी अनेक खुलासे केले. 

जिगरा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया कपिलच्या शोमध्ये पोहचली होती.  यावेळी कपिलने आलियाच्या स्पाय थ्रिलर चित्रपटांचा उल्लेख केला. लग्नापूर्वी अभिनेत्रीने 'राझी' या स्पाय थ्रिलरमध्ये गुप्तहेराची भूमिका साकारली होती आणि लग्नानंतर ती 'अल्फा' या स्पाय थ्रिलरमध्ये दिसणार आहे. कपिलने आलियाला विचारले, "आलिया, तुला काय वाटते, मुली लग्नाआधी किंवा नंतर हेरगिरी करतात? मी थेट मुद्द्यावर येतो. तू कधी रणबीरची हेरगिरी केली आहे का?" आलियाने उत्तर दिले की, "मला त्याची हेरगिरी करण्याची गरज कधीच वाटली नाही".



याशिवाय आलियाने रणबीर आणि राहामधील नात्याबद्दलही सांगितलं. राहा आणि रणबीरमध्ये खूप चांगली मैत्री आहे. तिच्यासाठी तो मल्याळी अंगाई गीत गातो आणि त्याने वेगवेगळे धमाल खेळ राहासाठी तयार केल्याच आलिया म्हणाली. 


दरम्यान, आलिया आणि वेदांग रैनाची मुख्य भूमिका असलेला जिगरा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. एका भावा-बहिणीची गोष्ट असलेला हा सिनेमा असून 11 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होतोय. जिगरा नंतर ती 'अल्फा' आणि 'लव्ह अँड वॉर' सारख्या चित्रपटात दिसणार आहे. तर रणबीर कपूर नितेश तिवारीच्या 'रामायण',  संजय लिला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' आणि संदीप रेड्डी वांगा यांच्या 'ॲनिमल पार्क'मध्ये दिसणार आहे.

Web Title: Alia Bhatt Spies on Husband Ranbir Kapoor? Jigra Stars Alia Bhatt reveals in Kapil Sharma's show