गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 10:35 IST2025-09-02T10:35:02+5:302025-09-02T10:35:13+5:30
गणपती बाप्पाच्या विसर्जनाला रणबीरसोबत दिसली नाही यामुळे काही दिवसांपासून आलिया भट सोशल मीडियावर ट्रोल होतीये.

गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंबाची नेहमीच चर्चा असते. दरवर्षी कपूर घराणं वाजत गाजत गणेशोत्सव साजरा करतात. दोन दिवसांपूर्वी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि नीतू कपूर यांनी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. दरवर्षी त्यांचा बाप्पाच्या विसर्जनाचा व्हिडिओ नेहमी येत असतोय मात्र आलिया भट (Alia Bhatt) कुठेच नसते. याहीवर्षी गणपती विसर्जनाला रणबीर आईसोबतच दिसला. पत्नी आलिया नसल्याने नेटकऱ्यांनी कमेंट करत आलियाला ट्रोल केलं. मात्र आता आलियाने वेगळ्या पद्धतीने ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.
काही दिवसांपासून आलिया भट सोशल मीडियावर ट्रोल होतीये. गणपती बाप्पाच्या विसर्जनाला रणबीरसोबत ती दिसली नाही. गेल्यावर्षीही ती दिसली नव्हती. यावरुन आलियाला यावर्षीही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 'आलिया कुठे? पार्टी तर करत असते सणांनाच दिसत नाही','आलिया ब्रिटिश आहे म्हणून ती भारतीय सण साजरे करत नाही' अशा कमेंट्स आल्या होत्या.
मात्र आता आलियाने थेट गणेशोत्सवाचे फोटोच शेअर केले आहेत. बाप्पाासमोर ती सासू नीतू कपूर यांच्यासोबत उभी आहे. त्यांनी पारंपरिक कपडे परिधान केले आहेत. आलिया हिरव्या पंजाबी ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. तसंच गुलाबी साडीतही तिने फोटो पोस्ट केले आहेत. तसंच हातात उकडीचा मोदक घेऊनही तिने फोटो शेअर केला आहे. 'प्रेम, आशीर्वाद आणि मोदक' असं कॅप्शन तिने दिलं आहे.
आलिया भट आगामी 'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार आहे. संजय लीला भन्साळींच्या या सिनेमात रणबीर कपूर आणि विकी कौशल यांचीही भूमिका आहे. तसंच आलिया यशराजच्या स्पाय युनिव्हर्समधील 'अल्फा' सिनेमात फुल अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. तिच्यासोबत शर्वरी वाघचीही मुख्य भूमिका आहे.