वाढदिवसादिवशी आलिया भटने शेअर केला 'सीता'चा फर्स्ट लूक, 'आरआरआर'साठी चाहते झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 12:40 PM2021-03-15T12:40:38+5:302021-03-15T12:41:11+5:30

आलिया भटने तिच्या वाढदिवसा निमित्ताने तिने तिच्या चाहत्यांना खूप मोठे सरप्राइज दिले आहे.

Alia Bhatt shares first look of 'Sita' on birthday, fans go crazy for 'RRR' | वाढदिवसादिवशी आलिया भटने शेअर केला 'सीता'चा फर्स्ट लूक, 'आरआरआर'साठी चाहते झाले क्रेझी

वाढदिवसादिवशी आलिया भटने शेअर केला 'सीता'चा फर्स्ट लूक, 'आरआरआर'साठी चाहते झाले क्रेझी

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आज म्हणजेच १५ मार्च रोजी २८वा वाढदिवस साजरा करते आहे. या निमित्ताने तिने तिच्या चाहत्यांना खूप मोठे सरप्राइज दिले आहे. आलिया भटने चित्रपट 'आरआरआर'मधील फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटात आलिया सीताच्या भूमिकेत दिसणार आहे.

आलिया भटचा चित्रपट 'आरआरआर' एसएस राजमौली बनवत आहे. या चित्रपटातून आलिया तेलगू सिनेइंडस्ट्रीत पाउल टाकते आहे. आलिया या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. तिने तिच्या वाढदिवसादिवशी उत्सुकतेत चाहत्यांसोबत चित्रपटातील तिच्या पात्राबद्दल सांगितले आहे.

आलियाने शेअर केलेल्या फोटोत एका ब्लॅक शेडेड जागेवर बसलेली दिसते आहे. फर्स्ट लूक पाहून समजते आहे की ती कोणत्या तरी मंदिरात बसली आहे. मंदिरात भगवान रामाची मूर्ती दिसते आहे.


'आरआरआर'मधील फोटो शेअर करत आलिया भटने लिहिले की, तिचा पूर्ण लूक सोमवारी प्रदर्शित केला जाणार आहे. 'आरआरआर'मध्ये आलियासोबत ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण आणि राम चरण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. असे सांगितले जात आहे की हा एक पीरिएड ड्रामा चित्रपट आहे. यात हे सर्व कलाकार पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट जवळपास १० भाषेत रिलीज केला जाणार आहे. हा सिनेमा १३ ऑक्टोबर, २०२१ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Web Title: Alia Bhatt shares first look of 'Sita' on birthday, fans go crazy for 'RRR'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.