'धुरंधर २'मधील 'त्या' सीनवर आलिया भट फिदा; रणवीर सिंग-आदित्य धरचं कौतुक करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:04 IST2026-03-23T11:03:25+5:302026-03-23T11:04:58+5:30

सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण 'धुरंधर २' या चित्रपटाच्या प्रेमात पडला आहे.

Alia Bhatt Reaction After Watching Dhurandhar 2 Praise Aditya Dhar Direction And Ranveer Singh Performance | 'धुरंधर २'मधील 'त्या' सीनवर आलिया भट फिदा; रणवीर सिंग-आदित्य धरचं कौतुक करत म्हणाली...

'धुरंधर २'मधील 'त्या' सीनवर आलिया भट फिदा; रणवीर सिंग-आदित्य धरचं कौतुक करत म्हणाली...

Alia Bhatt Review Dhurandhar 2 : आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत असलेला 'धुरंधर २' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चाहत्यांनी सोशल मीडिया अक्षरश: 'धुरंधर'मय करुन टाकलं आहे.  विशेषत: अभिनेता रणवीरचं विशेष कौतुक होत आहे.  त्यानं साकारलेलं जसकिरत आणि हमजा हे पात्र कौतुकास्पद होतं. चित्रपटाला प्रेक्षकांबरोबरच इंडस्ट्रीतील कलाकारांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यातच आता अभिनेत्री आलिया भट हिनेही या चित्रपटाबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आलिया भटने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर 'धुरंधर २' बद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने चित्रपटातील एका विशिष्ट पात्राचा आणि प्रसंगाचा उल्लेख केला. आलिया म्हणाली, "'जसकीरत सिंग रंगी' हा क्षणच सर्वकाही आहे! जेव्हा एखादा अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यात परिपूर्ण ताळमेळ असतो, तेव्हा जी जादू घडते, ती या क्षणात अचूकपणे टिपली गेली आहे". आलियाने या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण 'धुरंधर' टीमचे अभिनंदन केले.

गेल्या वर्षी 'धुरंधर'च्या पहिल्या भागाने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती, मात्र 'धुरंधर २' ला मिळणारा प्रतिसाद हा त्यापेक्षाही कैक पटीने अधिक अभूतपूर्व असल्याचे चित्र दिसत आहे. आलियाने यापूर्वी पहिल्या भागाचेही भरभरून कौतुक केले होते.

बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'चीच हवा!

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या स्पाय थ्रिलरने प्रेक्षकांना सिनेमागृहांकडे खेचून आणले आहे. या चित्रपटाने केवळ देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही आपली छाप पाडली असून अवघ्या चार दिवसांत 'धुरंधर २' जगभरातील कमाई ६९१.३२ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. रविवारी सुट्टीचा फायदा घेत या चित्रपटाने भारतात ११४.८५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले, जे शनिवारी केलेल्या ११३ कोटींच्या कमाईपेक्षाही जास्त आहे. या प्रचंड प्रतिसादामुळे 'धुरंधर २' चित्रपटाने सनी देओलच्या 'गदर २', रजनीकांत यांच्या 'जेलर' आणि प्रभासच्या 'सालार' यांसारख्या दिग्गज चित्रपटांच्या एकूण कमाईला मागे टाकले आहे. भारतातील 'धुरंधर २' या चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन ४५४.१२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
 

Web Title : आलिया भट्ट 'धुरंधर 2' पर फिदा, रणवीर सिंह और आदित्य धर की प्रशंसा की।

Web Summary : आलिया भट्ट ने इंस्टाग्राम पर 'धुरंधर 2' की प्रशंसा की, एक विशेष दृश्य को उजागर किया जो अभिनेता-निर्देशक तालमेल को दर्शाता है। उन्होंने रणवीर सिंह की दोहरी भूमिका और आदित्य धर के निर्देशन की सराहना की। फिल्म की वैश्विक सफलता बॉक्स ऑफिस पर जारी है।

Web Title : Alia Bhatt praises 'Dhurandhar 2', lauds Ranveer Singh and Aditya Dhar.

Web Summary : Alia Bhatt praised 'Dhurandhar 2' on Instagram, highlighting a specific scene showcasing perfect actor-director synergy. She lauded Ranveer Singh's dual role and Aditya Dhar's direction. The film's global success continues, surpassing other major releases at the box office.