"काही सेकंदाच्या व्हिडीओवरुन...", ट्रोलिंगवर आलिया भट स्पष्टच बोलली, 'मी आणि रणबीर...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 14:01 IST2026-01-31T14:00:40+5:302026-01-31T14:01:18+5:30
रणबीर कपूर आणि आलियाला अनेकदा काही व्हिडीओ व्हायरल करुन ट्रोल केलं जातं.

"काही सेकंदाच्या व्हिडीओवरुन...", ट्रोलिंगवर आलिया भट स्पष्टच बोलली, 'मी आणि रणबीर...'
रणबीर कपूर आणिआलिया भट हे बॉलिवूडमधलं पॉवर कपल आहे. रणबीर-आलियाला दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांना राहा ही क्युट मुलगी आहे. रणबीर हा आलियाचा आधीपासूनच क्रश होता हे तिने खूप सुरुवातीलाच सांगितलं होतं. तिचा क्रशच नंतर तिचा बॉयफ्रेंड आणि नवराही झाला.'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या तयारीवेळी दोघं प्रेमात पडले. रणबीर-आलियाचे जितके चाहते आहेत तितकेच त्यांना ट्रोल कमी नाहीत. त्यांच्या अनेक व्हिडीओंवरुन दोघांना ट्रोल केलं गेलं आहे. यावर आता नुकतंच आलियाने भाष्य केलं आहे.
एसक्वायर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ट्रोलिंगवर् आलिया म्हणाले, "तो सगळा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतच नाही कारण ते सगळं खरं नसतं. लोक केवळ २-४ सेकंदांचा व्हिडीओ पाहून त्यांचं मत देतात. आम्ही ७ वर्षांपासून एकत्र आहोत आणि हे त्या ७ सेकंदांपेक्षा खूप जास्त आहे."
ती पुढे म्हणाली, "जर तुम्ही एखाद्या खोलीत जाल आणि तिथे ५० लोक असतील तर त्यातले ४ लोक तुमच्याबद्दल चांगलं बोलणारी असतील. बाकी फक्त दिखावाच करतील पण म्हणून तुम्ही त्यांचं ऐकत नाही. त्यांच्या बोलण्यामुळे माझ्या कुटुंबावर थोडीच फरक पडणार आहे? अजिबातच नाही. मी माझं स्वप्न जगत आहे का? तर हो...रोज रात्री झोपण्याआधी मी माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असते? तर हो १०० टक्के."
आलिया भटने २०२२ साली रणबीर कपूरशी मुंबईतील घरीच लग्नगाठ बांधली. केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न झालं. घराच्या बाल्कनीतच त्यांचा हा लग्नसोहळा होता. लग्नानंतर ७ महिन्यातच नोव्हेंबरमध्ये आलियाने मुलीला जन्म दिला.
आलिया आणि रणबीर लवकरच 'लव्ह अँड वॉर' सिनेमात दिसणार आहे. संजय लीला भन्साळी सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. सध्या सिनेमाचं शूट सुरु आहे. तसंच ते नंतर 'ब्रह्मास्त्र'च्या पुढच्या पार्टमध्येही झळकणार आहेत.