'शमशेरा'मधील रणबीर कपूरच्या इंटेस लूकवर आलिया भट झाली फिदा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 16:09 IST2022-06-20T16:08:32+5:302022-06-20T16:09:14+5:30
'शमशेरा' (Shamshera) मधील लांब केस, दाढी, धारदार डोळे असलेला रणबीर कपूर(Ranbir Kapoor)चा हा आत्तापर्यंतचा सर्वात वेगळा अवतार आहे. केवळ चाहतेच नाही तर रणबीरची पत्नी अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) देखील या लूकवर खूपच प्रभावित दिसत आहे.

'शमशेरा'मधील रणबीर कपूरच्या इंटेस लूकवर आलिया भट झाली फिदा, म्हणाली...
रणबीर कपूर(Ranbir Kapoor)च्या शमशेरा (Shamshera) चित्रपटातील त्याचा लूक लीक झाल्यानंतर सोमवारी त्याचे अधिकृत पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. लांब केस, दाढी, धारदार डोळे असलेला रणबीरचा हा आत्तापर्यंतचा सर्वात वेगळा अवतार आहे. केवळ चाहतेच नाही तर रणबीरची पत्नी अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) देखील या लूकवर खूपच प्रभावित दिसत आहे. आलिया भटने ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हार्ट आय इमोजीसह रणबीरचे पोस्टर शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की- 'ये हुई ना हॉट मॉर्निंग... म्हणजे गुड मॉर्निंग.' आपल्या पतीच्या या इंटेन्स लूकवर आलिया पुन्हा एकदा मन हरवून बसल्याचे स्पष्ट झाले आहे. रणबीरच्या शमशेरा लूकवर चाहत्यांच्या सकारात्मक प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. तर काही जण तिला ट्रोल करताना दिसत आहेत.
Now that’s a hot morning .. I mean .. good morning 😍😬 pic.twitter.com/JzqdFdlkCb
— Alia Bhatt (@aliaa08) June 20, 2022
एका यूजरने लिहिले - 'भारतीय माता: ही काय अवस्था आहे... न्हावीच्या दुकानात जा आणि केस कापून घ्या.' आलियाच्या ट्विटला प्रमोशन स्टंट म्हणत दुसऱ्याने लिहिले- 'सध्या नवरा बायको एकमेकांसाठी पेड ट्विट मोफत करतील.' तर, आलिया-रणबीरच्या चाहत्यांनीही टोमणे मारणाऱ्यांना उत्तर दिले आहे.
करण मल्होत्रा दिग्दर्शित शमशेरा या चित्रपटाची कथा एका कुळाच्या त्यांच्या हक्कांसाठी आणि ब्रिटिशांपासून स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लढ्याभोवती फिरते. कथा काझा नावाच्या एका काल्पनिक गावात सेट केली आहे, जिथे शुद्ध सिंग नावाचा क्रूर हुकूमशाही सेनापती एका योद्ध्याला पकडतो आणि छळ करतो. गुलामगिरीतून उठून पुढारी बनलेल्या या योद्ध्याचे जीवन या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.