कपूर खानदानात लवकरच वाजणार सनई-चौघडे, आलियाच्या आईला ही आहे मुलगा पसंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 15:50 IST2018-09-18T15:43:53+5:302018-09-18T15:50:40+5:30
रणबीर कपूर आणि आलियाच्या अफेअरच्या चर्चा आता जुनी झाली आहे. महेश भट्ट आणि ऋषी कपूर दोघांच्या ही वडीलांनी हे नातं आपल्याला पसंत असल्याचे बोलण्यातून सांगितले आहे

कपूर खानदानात लवकरच वाजणार सनई-चौघडे, आलियाच्या आईला ही आहे मुलगा पसंत
रणबीर कपूर आणि आलियाच्या अफेअरच्या चर्चा आता जुनी झाली आहे. महेश भट्ट आणि ऋषी कपूर दोघांच्या ही वडीलांनी हे नातं आपल्याला पसंत असल्याचे बोलण्यातून सांगितले आहे. आलिया आणि रणबीरही आपलं नातं कधी सार्वजनिक ठिकाणी लपवलं नाही. आलिया आपल्या आईच्या खूप जवळ आहे त्यामुळे सोनी राजदान यांचा निर्णय दोनही कुटुंबियांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे. आलियाची आई म्हणाली, रणबीर खूप चांगला मुलगा आहे. त्यापुढे म्हणाल्या, आलियासोबत खूप चांगले नातं त्यामुळे आम्ही थेट त्याच्याशी बोलतो. महेश भट्ट आणि ऋषी कपूर यांना तर आधीपासून या रिलेशनशीपची कल्पना आहे.
नुकताच दोघांचा पार्टी करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जी हा सुद्धा या कपलसोबत होता. तिघांनीही पार्टी मस्त एन्जॉय केली. सोबत या पार्टीचा फोटोही अपलोड केला. रणबीर व आलियाचा हा फोटो पाहिला आणि चाहत्यांनी एका पाठोपाठ एक कमेंट देणे सुरू केले. यातल्या एका कमेंटने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. होय, ही कमेंट होती रणबीरची मॉम नीतू सिंग यांची. नीतू यांनी आलिया व रणबीरच्या या फोटोवर सुंदर कमेंट दिली. या कमेंटमध्ये काहीही न बोलता नीतू खूप काही बोलून गेल्या. आलिया आपल्याला किती आवडते, हेच जणू त्यांनी यातून दर्शवले.
ब्रह्मास्त्रचे शूटींग संपताच भट्ट आणि कपूर कुटुंबाने फॅमिली डिनरचा प्लान केला असल्याचे कळतेय. खरे तर आलिया व रणबीर दोघांचाही एकमेकांच्या कुटुंबासोबत खूप चांगला बॉन्ड आहे. आलिया अनेकदा रणबीरची मॉम नीतू कपूर यांच्यासोबत दिसली आहे. रणबीरही अर्ध्या रात्री आलियाचे डॅड महेश भट्ट यांच्यासोबत दिसला आहे. केवळ इतकेच नाही तर आलियाचा आई सोनी राजदान ही सुद्धा रणबीरची फॅन आहे.