आलियाच्या मंगळसूत्रात आहे रणबीरचा लकी नंबर 8, तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 11:01 IST2022-04-15T10:59:55+5:302022-04-15T11:01:52+5:30

Ranbir-Alia Wedding : फॅन्ससोबतच इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नाबाबत फॅन्समध्ये चांगली उत्सुकता बघायला मिळाली. 

Alia Bhatt mangalsutra has Ranbir Kapoor lucky number 8 | आलियाच्या मंगळसूत्रात आहे रणबीरचा लकी नंबर 8, तुम्ही पाहिला का?

आलियाच्या मंगळसूत्रात आहे रणबीरचा लकी नंबर 8, तुम्ही पाहिला का?

Ranbir-Alia Wedding : १४ एप्रिल ही तारीख रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यासाठी यादगार ठरली. कारण याच दिवशी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे मिस्टर अॅन्ड मिसेस कपूर झालेत. आलियाने काल लग्नानंतर तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फॅन्ससोबतच इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नाबाबत फॅन्समध्ये चांगली उत्सुकता बघायला मिळाली. 

रणबीर आणि आलियाच्या लग्नादरम्यान त्याचा लकी नंबर ८ ची खूप चर्चा झाली. रणबीर ८ हा त्याचा लकी नंबर मानतो. आलिया आणि रणबीर एकमेकांवर किती प्रेम करतात याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, आलियाच्या वेडिंग लूकमध्ये त्याचा लकी ८ नंबर जागोजागी दिसतो.

मंगळसूत्र आहे खास?

रणबीरने आलियाला लग्नात जे मंगळसूत्र घातलं, ते कपलसाठी फार खास आहे. आलियाच्या मंगळसूत्राचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मंगळसूत्र जर तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला त्याता रणबीरचा लकी नंबर ८ दिसेल. जो नेहमीसाठी आता आलियासोबत राहणार आहे. आलियाच्या मंगळसूत्रात एक गोल्ड चेन आहे. ज्यात ब्लॅक मोती आहेत. डायमंड पेंडेंटच्या वर इनफिनिटी म्हणजे ८ चा साइन आहे. 

आलियाच्या मंगळसूत्रासोबतच तिच्या इतरही काही दागिन्यांवर नंबर ८ लिहिलेलं आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, आलियाने रणबीरसोबतच त्याचा लकी नंबर ८ सुद्धा नेहमीसाठी आपला केला आहे. 

रिपोर्ट्सनुसार, मंगळसूत्रांसोबतच इतर दागिन्यांवर आणि मेहंदीमध्ये इनफिनिटी डिझाइन करण्याचे खास इन्स्ट्रक्शन दिले गेले होते. हे सगळं बघून लोक हेच म्हणतील की, रणबीरवर आलियाचं खरंच किती प्रेम आहे. 
 

Web Title: Alia Bhatt mangalsutra has Ranbir Kapoor lucky number 8