उलटं ब्लाऊज घातलंस का? आलिया भटच्या ‘फॅशन’ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 15:51 IST2021-11-21T15:50:18+5:302021-11-21T15:51:20+5:30
Alia Bhatt gets trolled : काल रात्री आदित्य सील व अनुष्का रंजनची संगीत सेरेमनी झाली आणि या पार्टीत आलिया भटने सर्वांचं लक्ष वेधलं.

उलटं ब्लाऊज घातलंस का? आलिया भटच्या ‘फॅशन’ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
बॉलिवूडमध्ये सध्या वेडिंग सीझन सुरू आहे. नुकतंच राजकुमार राव व पत्रलेखा यांचा विवाह सोहळा पार पडला. आज आदित्य सील व अनुष्का रंजन ही सेलिब्रिटी जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. काल रात्री अनुष्का व आदित्यची संगीत सेरेमनी (Anushka Ranjan-Aditya Seal sangeet) झाली आणि या पार्टीत आलिया भटने (Alia Bhatt ) सर्वांचं लक्ष वेधलं. तिच्या बोल्ड ड्रेसची चर्चा रंगली नसेल तर नवल. आलियाचा मॉडर्न स्टाईलच्या लहंगा-चोलीतील लुक काहींना आवडला तर काहींनी यावरून आलियाला ट्रोल करणं सुरू केलं.
आलियाने या पार्टीत लाइम ग्रीन आणि पिंक कलरचा लहंगा घातला होता. यावेळी तिच्या क्रॉस नेकच्या ब्लाऊजची चांगलीच चर्चा झाली. अनेकांना आलियाचा ड्रेसिंग सेन्स आवडला नाही. मग काय लोकांनी सोशल मीडियावर आलियाला ट्रोल करायला सुरूवात केली. ‘फॅशन डिजास्टर ऑफ द इअरचा अवार्ड यावर्षी मिस आलियाला मिळायला हवा,’ अशी कमेंट एका चाहत्याने केली. ‘आलियाने हे काय घातलं? फॅशनच्या नावावर काहीही,’अशी कमेंट एका चाहतीने केली. ‘घाईघाईत उलटं ब्लाऊज घातलं वाटतं,’ अशा शब्दांत नेटक-यांनी तिच्या लुकची खिल्ली उडवली.
अनुष्का रंजनच्या संगीत सेरेमनीत आलियाने धमाकेदार डान्सही केला. या पार्टीचे इनसाइड व्हिडीओही व्हायरल होत आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर आलिया लवकरच ब्रह्मास्त्र, गंगूबाई काठियावाडी, आरआरआर या चित्रपटात दिसणार आहे.