आलिया भट्टच्या चाहत्यांना मिळणार एक सरप्राईज! वाचा, सविस्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 10:16 IST2017-08-31T04:46:35+5:302017-08-31T10:16:35+5:30

आलिया भट्ट हिला सध्या तरी बॉलिवूडमध्ये तोड नाही. इतक्या कमी वयात, प्रसिद्धी, पैसा, यश, ग्लॅमर असे सगळे काही डौलाने ...

Alia Bhatt fans will get a surprise! Read, detailed !! | आलिया भट्टच्या चाहत्यांना मिळणार एक सरप्राईज! वाचा, सविस्तर!!

आलिया भट्टच्या चाहत्यांना मिळणार एक सरप्राईज! वाचा, सविस्तर!!

िया भट्ट हिला सध्या तरी बॉलिवूडमध्ये तोड नाही. इतक्या कमी वयात, प्रसिद्धी, पैसा, यश, ग्लॅमर असे सगळे काही डौलाने मिरवणा-या आलियाची अद्याप एकही निवड चुकलेली नाही. होय, आम्ही बोलतोय ते आलियाच्या चित्रपटाच्या निवडीबद्दल. आलियाने जो ही चित्रपट निवडला, तो हिट झाला. आलियाने अगदी बारकाईने स्वत:साठी योग्य आणि वेग-वेगळ्या भूमिका निवडल्या. तिचे आजचे यश याचाच परिपाक आहे. लवकरच आलिया मेघना गुलजार हिच्या ‘राजी’ या चित्रपटात दिसणार आहे. तेही नेहमीप्रमाणे एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत. याशिवाय आलिया या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांना आणखी एक सरप्राईजही देणार आहे. २०१४ मध्ये आलियाचा ‘हायवे’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील ‘मैना ने सूहा साहा ले जाना खोय के’ हे गाणे तुम्हाला आठवत असेलच. हे गाणे आलियाने गायले होते. म्हणजेच ‘हायवे’ या चित्रपटाने आणि यातील या गाण्याने आलियाने पार्श्वगायिका ही नवी ओळखही दिली होती. आता आम्ही आलियाच्या अ‍ॅक्टिंगवरून एकदम तिच्या सिंगींगवर का आलोत, हे तुम्हाला कळले असेलच.

ALSO READ : SHOCKING !! आलिया भट्टचा ‘हा’ न्यूड फोटो खरा की खोटा?

सरप्राईज हेच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राजी’ या चित्रपटासाठीही आलिया गाणार आहे. या चित्रपटातील एक गाणे आलियाने गायलेले असणार आहे. सिंगर-कंम्पोझर राम संपथने कम्पोझ केलेले हे गाणे हृदयाला भिडणारे असणार आहे. आलिया या गाण्याला आपल्या स्वरांचा साज चढवणार आहे.  विशेष म्हणजे, हे गाणे अनप्लग्ड व्हर्जन किंवा प्रमोशनल साँग नसेल तर एक सिच्युएशनल नंबर असणार आहे. कथानकात एका महत्त्वपूर्ण वळणावर, स्थितीला अनुसरून हे गाणे चित्रपटात समाविष्ट असेल. आहे ना आनंदाची बातमी!!

Web Title: Alia Bhatt fans will get a surprise! Read, detailed !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.