अभिनयानंतर 'या' क्षेत्रात पदार्पण करणार आलिया भट्ट ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 16:27 IST2017-07-19T10:56:04+5:302017-07-19T16:27:59+5:30
बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट लवकरच आपला सिंगिंग अल्बम लाँच करु शकते. प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर, परिणीती चोप्रापासून सलमान ...

अभिनयानंतर 'या' क्षेत्रात पदार्पण करणार आलिया भट्ट ?
ब लिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट लवकरच आपला सिंगिंग अल्बम लाँच करु शकते. प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर, परिणीती चोप्रापासून सलमान खानपर्यंत सगळ्यांनी प्लेबॅक सिंगिंमध्ये आपला हात आजमावला आहे. यानंतर आलिया भट्टसुद्धा आपला म्युझिक अल्बम रिलीज करु शकते अशी चर्चा आहे. आलिया म्हणाली, मी म्युझिक अल्बम फक्त एन्जॉयमेंटसाठी करु शकते मात्र सध्या माझे पूर्ण लक्ष माझ्या करिअर केंद्रीत आहे. जर मी कोणता म्युझिक अल्बम केला तर तो फ्क माझे संगीतावर असणाऱ्या प्रेमापायी मी करेन. पण माझे पूर्ण फोकस अभिनयावर आहे. आलिया म्हणाली मी रसिकांसमोर लाइव्ह गाऊ शकतं नाही. मला हे कठिण वाटते. तसेच माझा एक प्राब्लेम आहे की मी वाद्यांसोबत गाऊ शकते नाही. जेव्हा एखादं म्युझिक सुरु होते तेव्हा मी गाऊ शकतं नाही. मात्र नाही या शब्दावर माझा विश्वास नाही आहे. त्यामुळे भविष्यात मी एखाद्या म्युझिक अल्बममध्ये गाताना नक्कीच दिसू शकते.
आलियाला नुकताच आयफामध्ये उडता पंजाबमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर तिला स्टाईल आयकॉन पुरस्काराने सुद्धा गौरविण्यात आले. न्यूयॉर्कमध्ये रंगलेल्या या सोहळ्याच्या ठिकाणी आलिया आणि कॅटरिनाच्या जोडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. याठिकाणी दोघी ही एकमेकींच्या गळ्यात गळे घालून फिरत होत्या. न्यूयॉर्कच्या कॅफी शोपमध्ये दोघी एकत्र कॉफी पिताना दिसल्या ऐवढेच नाही तर दोघींनी एकाच मग मधून कॉफी घेतली होती.