या कारणामुळे आलिया भट स्टेजवरच लागली रडायला, VIDEO होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 14:45 IST2019-12-02T14:44:51+5:302019-12-02T14:45:45+5:30
आलियाने नुकतीच एका सेमिनारला हजेरी लावली होती. याच सेमिनारमधील हा व्हिडिओ आहे.

या कारणामुळे आलिया भट स्टेजवरच लागली रडायला, VIDEO होतोय व्हायरल
आलिया भटचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया भट प्रचंड रडताना दिसत आहे. आलिया भटला काय झाले की ती इतकी रडायला लागली हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला आहे. या व्हिडिओत आपल्याला तिच्यासोबत तिच्या बहिणीला देखील पाहायला मिळत आहे.
आलियाने नुकतीच एका वुमन सेमिनारला हजेरी लावली होती. याच सेमिनारमधील हा व्हिडिओ आहे. ती या सेमिनारमध्ये तिची बहीण शाहीन भटच्या आय हॅव नेव्हर बीन अनहॅप्पीयर या पुस्तकाविषयी बोलताना दिसत आहे. हे पुस्तक आलियासाठी खूप खास आहे. कारण या पुस्तकात शाहीनने तिच्या आयुष्याविषयी काही गोष्टी मांडल्या आहेत. शाहीन अनेक वर्षं डिप्रेशनमध्ये होती. डिप्रेशनमध्ये असताना तिला कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागले हे तिने या पुस्तकात लिहिले आहे. आलिया या इव्हेंटमध्ये डिप्रेशनविषयी बोलत होती. त्यावेळी ती खूप भावुक झाली असल्याचे दिसून आले. आलिया रडत असल्याने शाहीन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला शांत करताना तीच भावुक झाली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला दिसेल की, आलिया रडत असून शाहीन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आलियाचे अश्रू थांबतच नाहीयेत.
शाहीन केवळ 13 वर्षांची असल्यापासून ती डिप्रेशनमध्ये आहे. अनेकवेळा ती डिप्रेशनविषयी मोकळ्यापणाने बोलली असून ती सोशल मीडियावर देखील याविषयी लिहित असते. पुस्तकात तर तिने तिच्या डिप्रेशनविषयी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत.