गरोदरपणात आलिया भटला लागले होते डोहाळे, आवडायचा 'हा' बंगाली पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 12:53 IST2024-03-15T12:32:35+5:302024-03-15T12:53:19+5:30

राहाच्या वेळी आलियाला काय खाण्याचे डोहाळे लागलेले?

Alia Bhatt Craved For Bengali Sweet During Her Pregnancy Reveals Nutritionist | गरोदरपणात आलिया भटला लागले होते डोहाळे, आवडायचा 'हा' बंगाली पदार्थ

राहाच्या वेळी आलियाला काय खाण्याचे डोहाळे लागलेले?

अभिनेत्री आलिया भट खूप लोकप्रिय आहे. ती कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. आलिया आणि  रणबीर कपूर यांची लेक राहादेखील अतिशय क्यूट आहे. काही दिवसांपुर्वीच रणबीर आणि आलियाने आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला होता. तेव्हापासून तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चाहते हे आलिया आणि राहाविषयीविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी  उत्सुक असतात. अशातच आता जेव्हा आलिया गरोदर होती, तेव्हा तिला कोणते डोहाळे लागले होते, हे समोर आलं आहे.

 गरोदरपणातील डोहाळे हा खूप लाड पुरवून घेण्याचा अनुभव असतो. सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ सुमन अग्रवालने नुकतचं एका पॉडकास्टमध्ये आलियाला राहाच्यावेळी (Raha Kapoor) काय खाण्याचे डोहाळे लागले होते, यावर भाष्य केलं आहे. लाडक्या लेकीच्या जन्मावेळी आलियाला एक खास बंगाली पदार्थ खायची सारखी इच्छा व्हायची. सुमन अग्रवाल यांनी पॉडकास्टमध्ये आलिया भट्टला गरोदरपणात बंगाली गोड पदार्थ खायला खूप आवडायचा असं सांगितलं.

त्या म्हणाल्या, ' कोणतीही महागडी, तुपातली मिठाई खाण्यापेक्षा आलियाला कोलकातातील नोलेन गुड संदेश (Nolen Gur Sandesh) खाण्याचे डोहाळे लागले होते. गरोदरपणात आलियाने मला अनेकवेळा फोन करून कोलकाता येथील नोलेन गुड संदेश हा पदार्थ मागवून घेतला आह, 'आलिया भट्ट आवडीने बंगाली मिठाई खात असे.  कोलकातातील गूळ आलियाला प्रचंड आवडतो. त्यामुळे वारंवार ती हा गूळ खात असे'. यासोबतच सुमन यांनी करीना कपूरलाही पराठे आणि वेगवेगळ्या भाज्या खाण्याचे डोहाळे लागले होते, असं सांगितलं.  

आलिया भट आणि रणबीर कपूर हे काही वर्ष एकमेंकाना डेट केल्यानंतर 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर 27 जून 2022 रोजी त्यांनी प्रेग्नंसीची घोषणा केली आणि आलिया भट्टने 6 नोव्हेंबर 2022 रोजी राहाला जन्म दिला. आलिया-रणबीरच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. रणबीरचा 'अ‍ॅनिमल' (Animal) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर आलिया 'जिगरा' या सिनेमाच्या माध्यमातून  बॉक्स ऑफिस गाजवणार आहे. 

Web Title: Alia Bhatt Craved For Bengali Sweet During Her Pregnancy Reveals Nutritionist