मुलीचा चेहरा लपवण्यावर आलिया भट्टने सोडल मौन, म्हणाली- 'आम्ही राहाचा...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 18:53 IST2023-11-05T18:50:02+5:302023-11-05T18:53:04+5:30

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर 6 नोव्हेंबरला एक वर्षाची होणार आहे. ​​​​

Alia Bhatt broke her silence on hiding her daughter raha face | मुलीचा चेहरा लपवण्यावर आलिया भट्टने सोडल मौन, म्हणाली- 'आम्ही राहाचा...'

मुलीचा चेहरा लपवण्यावर आलिया भट्टने सोडल मौन, म्हणाली- 'आम्ही राहाचा...'

बी-टाऊनचे पॉवरफुल कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर 6 नोव्हेंबरला एक वर्षाची होणार आहे. मात्र या जोडप्याने अद्याप तिचा चेहरा दाखवला नाही. आलिया आणि रणबीरने सुद्धा अनुष्का आणि विराटप्रमाणे 'नो फोटो पॉलिसी' फॉलो केली आहे. त्यामुळे चाहते राहाचा चेहरा कधी पाहायला मिळणार असा प्रश्न नेहमीच विचारत असतात. अशातच आलियाने राहाचा पहिला फोटो कधी शेअर करणार, याचा खुलासा केला आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’च्या लीडरशीप समिट २०२३मध्ये आलियाला राहाचा चेहरा कधी दाखवणार याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, 'माझ्या मुलीचा मला अभिमान आहे. आता कॅमेरा नसता तर मी तिचा फोटो सगळ्यांना दाखवला असता. आम्ही राहाचा चेहरा न दाखवण्याचा निर्णय घेतला.  तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हावा आणि तिला आता पापाराझीची गरज आहे, असं आम्हाला वाटतं नाही.  जेव्हा आम्हाला वाटेल ही वेळ योग्य आहे आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत. तेव्हा आम्ही राहाची पहिली झलक दाखवू'.

अलीकडेच रणबीर कपूरने 'झूम'वर त्याच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या होत्या. यामध्ये त्याने राहाचा पहिला वाढदिवस कसा साजरा करणार हे सांगितले होते. 'आम्ही राहासाठी घरी पार्टी आयोजित करणार आहोत, ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि राहाचे बहिण-भाऊ असतील. आम्ही सर्वजण त्या दिवसाची वाट पाहत आहोत. राहाच्या वाढदिवसासाठी कपूर आणि भट्ट कुटुंब खूप उत्सुक आहे'.

रणबीर- आलियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच रणबीर  ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटात तो दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर पाहायला मिळणार आहे. तर आलिया ‘जिगरा’ चित्रपटात झळकणार आहे. शिवाय, आलिया आणि रणबीर पुन्हा एकदा एकत्र ‘ब्रह्मास्त्र २’ मध्ये झळकणार आहे.

Web Title: Alia Bhatt broke her silence on hiding her daughter raha face