आलिया भटने खरेदी केला मुंबईत नवा आशियान, किंमत ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 11:49 AM2019-01-30T11:49:41+5:302019-01-30T11:57:34+5:30

आलिया भटचे नाव बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येते. कामवेळात आलियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे

Alia bhatt bought new flat in mumbai 13 core | आलिया भटने खरेदी केला मुंबईत नवा आशियान, किंमत ऐकून व्हाल थक्क

आलिया भटने खरेदी केला मुंबईत नवा आशियान, किंमत ऐकून व्हाल थक्क

googlenewsNext
ठळक मुद्देफ्लॉटसोबत आलियाने दोन पार्किंग स्पेसदेखील विकत घेतल्या आहेत सध्या आलिया आणि रणबीर  ‘ब्रह्मास्त्र’ शूटिंगमध्ये बिझी आहेत

आलिया भटचे नाव बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येते. कामवेळात आलियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. सहा वर्षांपूर्वी आलियाने स्टुडंट ऑफ द इअर सिनेमातून डेब्यू केला होता.

बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअरकडे वाटचाल सुरु झाल्यानंतर मुंबईत तिने दोन फ्लॅट खरेदी केले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार आलियाने तिसरा फ्लॅट खरेदी केले आहे. हा नवा फ्लॅट आलियाने जुहूमध्ये घेतला असून या फ्लॅटची किंमत तब्बल 13 कोटी असल्याचे समजतेय. 2300 स्वेअरचा हा फ्लॅट पहिल्या मजल्यावर आहे. फ्लॅटसोबत आलियाने दोन पार्किंग स्पेसदेखील विकत घेतल्या आहेत.    

 सध्या आलिया आणि रणबीर  ‘ब्रह्मास्त्र’ शूटिंगमध्ये बिझी आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. 'ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करतोय. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबतआलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. तसेच आलियाचा रणवीर सिंगसोबतचा गली बॉय सिनेमात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  १४ फेबु्रवारीला म्हणजेचं व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. रणवीर आणि आलिया दोघांचे फॅन्स या चित्रपटाची मोठ्या आतुरतेने वाट पाहतायेत. 

Web Title: Alia bhatt bought new flat in mumbai 13 core

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.