'स्टुडंट ऑफ द इयर' नाही तर 'हा' होता आलिया भटचा पहिला चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 06:26 PM2024-03-15T18:26:31+5:302024-03-15T18:27:30+5:30

आज आलियाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याविषयी काहील खास गोष्टी...

Alia Bhatt Birthday Alia played her first leading role in 'Student of the Year but Her First Movie Was Sangharsh At The Age Of 6 Years | 'स्टुडंट ऑफ द इयर' नाही तर 'हा' होता आलिया भटचा पहिला चित्रपट

'स्टुडंट ऑफ द इयर' नाही तर 'हा' होता आलिया भटचा पहिला चित्रपट

अभिनेत्री आलिया भटचा आज ३१ वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त चाहते व बॉलिवूडसेलिब्रिटी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. आलियानं आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वत:चा ठसा उमटवला आहे. अभिनेत्री म्हणून करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ (Student Of The Year) या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि या चित्रपटामुळेच तिला ओळख मिळाली.  पण तुम्हाला माहीत आहे का ‘स्टुडंट ऑफ द इयर’  हा आलियाचा पहिला चित्रपट नव्हता. या चित्रपटाच्या आधी तिनं एका चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती.  

आलियाचा जन्म 15 मार्च 1993 साली मुंबईत झाला होता. तिचे वडिल महेश भट हे निर्माता असल्यामुळं लहानपणापासूनच घरात चित्रपट मनोरंजनाचं वातावरण होतं. परिणामी तिला देखील अभिनयाची गोडी लागली.  ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा अभिनेत्री म्हणून आलियाचा हा पहिलाच चित्रपट नव्हता, तिने वयाच्या सहाव्या वर्षीच इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. तिनं अभिनेत्री प्रीती झिंटाच्या 'संघर्ष' चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यात आलियाने प्रीती झिंटाच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

'संघर्ष' चे दिग्दर्शन तनुजा चंद्रा यांनी केले होते आणि 'स्टुडंट ऑफ द इयर' हा करण जोहरचा चित्रपट होता. आतापर्यंत आलियानं अनेक दमदार सिनेमे केले आहेत. 'हायवे', 'टू स्टेट्स', 'डियर जिंदगी', 'राझी', 'कलंक', 'डार्लिंग्स', 'गंगूबाई काठियावाडी', 'आरआरआर', 'ब्रह्मास्त्र', 'अशा अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली. नुकताच तिचा 'रॉकी और रानी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. 

यासोबतच आलिया 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूड चित्रपटातही झळकली आहे. तर लवकरच आलिया ही  'तख्त' चित्रपटात दिसणार आहे, हा चित्रपट 24 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. 10 सप्टेंबर 2024 रोजी रिलीज होणाऱ्या संजय लीला भन्साळींच्या 'बैजू बावरा'मध्ये ती दिसणार आहे. याशिवाय ती 'जिगरा', 'ब्रह्मास्त्र 2', 'इंशाअल्लाह'मध्येही दिसणार आहे.

Web Title: Alia Bhatt Birthday Alia played her first leading role in 'Student of the Year but Her First Movie Was Sangharsh At The Age Of 6 Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.