'कान्स'नंतर आलिया भट पोहचली थेट स्पेनमध्ये, मैत्रिणीच्या लग्नात गर्ल गँगसोबत उडवली धमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:39 IST2025-05-27T16:39:05+5:302025-05-27T16:39:45+5:30

मैत्रिणीच्या लग्नात आलिया भट आपल्या गर्ल गँगसोबत धमाल करताना दिसून आली.

Alia Bhatt Attends Her Friend’s Tanya Saha Gupta Wedding In Spain See Photos | 'कान्स'नंतर आलिया भट पोहचली थेट स्पेनमध्ये, मैत्रिणीच्या लग्नात गर्ल गँगसोबत उडवली धमाल!

'कान्स'नंतर आलिया भट पोहचली थेट स्पेनमध्ये, मैत्रिणीच्या लग्नात गर्ल गँगसोबत उडवली धमाल!

Alia Bhatt Friend Wedding: अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं. तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकली. कान्सनंतर आलियाने फ्रान्स सोडून थेट मैत्रिणीच्या लग्नासाठी स्पेन गाठलं. या लग्नातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात ती लग्नाचा आनंद घेताना दिसतेय.

आलिया कधीही तिच्या गर्ल गँगला विसरत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. नुकतंच आलियाने तिची खास मैत्रीण तान्या शाह गुप्ताच्या लग्न समारंभाला हजेरी लावली. या कार्यक्रमात आलियासोबत तिची जवळची मैत्रीण आकांक्षा रंजन कपूरही होती. आलिया पारंपरिक लूकमध्ये खूपच उठून दिसली. आलिया तिचं वैयक्तिक आयुष्यही खूप आनंदात आणि मोकळेपणाने जगते. ती कामाबरोबरच मित्रपरिवारालाही तेवढंच महत्त्व देते.

आलिया भट दुसऱ्यांदा आई होणार?

आलियाचे कान्समधील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. काही फोटोत तिचे पोट दिसत असल्याचा अनेकांनी दावा केला आणि ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. आलियाने मात्र यावर अद्यापही कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. आता आलिया नक्की यावर काय प्रतिक्रिया देतेय हे पाहणं महत्त्वांच आहे. आलिया भटने आधीच एका मुलाखतीत दुसऱ्यांदा आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसंच यावेळी मुलगा झाला तर त्याचं नावही ठरवलं असल्याचं तिनं सांगितलं होतं. आलियाची लेक राहा आता २ वर्षांची आहे.

आलियाच्या कामाबद्दल...

आलियाच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ती लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात दिसणार आहे. जो २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक म्युझिकल ड्रामा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये रणबीर कपूरदेखली आहे.  याशिवाय आलिया 'अल्फा'मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये आलियासोबत मराठमोळी शर्वरी वाघ झळकणार आहे. आलिया भट शेवटची 'जिगरा' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता वेदांग रैना दिसला होता. हा चित्रपट भाऊ आणि बहिणीच्या कथेवर आधारित होता. पण हा चित्रपट फारसा कमाल दाखवू शकला नाही.

 

Web Title: Alia Bhatt Attends Her Friend’s Tanya Saha Gupta Wedding In Spain See Photos