'ही तर सेम टू सेम धोनीची मुलगी जीवा', Alia bhattचा बालपणीच्या फोटोची नेटकरी करताहेत तुलना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 13:32 IST2021-12-17T12:09:21+5:302021-12-17T13:32:16+5:30
आलिया भट (Alia Bhatt) चा एक बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'ही तर सेम टू सेम धोनीची मुलगी जीवा', Alia bhattचा बालपणीच्या फोटोची नेटकरी करताहेत तुलना
आलिया भट (Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच बॉयफ्रेंड रणबीर कपूर(Ranbir kapoor) सोबत स्क्रिन शेअर करताना दिसाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'ब्रह्मास्त्र'च्या मोशन पोस्टरची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, आलिया भटचा बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिची बेस्ट फ्रेंड आकांक्षा रंजनसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये आलिया खूपच क्यूट दिसत आहे आणि चाहत्यांकडून मजेदार कमेंट्सही येत आहेत.
बालपणीचा हा फोटो पाहून काही लोक आलिया भटची तुलना क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीची मुलगी जीवाशी करत आहेत. त्याचबरोबर आकांक्षा रंजनचा लूक पाहून काहींना सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची आठवण येत आहे. एका यूजरने लिहिले - जीवा धोनी दिसत आहे, सेम टू सेम.
बुधवारी 'ब्रम्हास्त्र' सिनेमाचं मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आलं. यावेळी रणबीर कपूर आणि आलिया सोबत दिसले. यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. यात रणबीर कपूर आलियाला विचारतो की, आपलं लग्न कधी होणार? यावर आलिया लाजत म्हणते की, तू मला हे का विचारत आहे?
रणबीरचा प्रश्न ऐकून लाजली आलिया रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लगेच अयान मुखर्जीकडे इशारा करत म्हणाला की, मी त्याला विचारत आहे की, आपलं लग्न कधी होणार आहे? यावर अयान म्हणाला की, आजसाठी फक्त एकच डेट पुरेशी आहे आणि ती हे ब्रम्हास्त्रची डेट. रणबीर कपूर एका व्हिडीओत आलियाची गंमत करताना दिसत आहे. त्याने आलियाला गंमतीने विचारलं की, तुझ्या आयुष्यात 'आर' चा अर्थ काय आहे? यावर आधी तर ती लाजली आणि मग तिने कसंतरी उत्तर दिलं.