सरकारी रुग्णालयात आईसोबत दिसली आलिया भट्ट; काय झाले असेल आलियाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 16:21 IST2017-09-26T10:49:57+5:302017-09-26T16:21:12+5:30

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट नुकतीच तिची मम्मी सोनी राजदानसोबत एका सरकारी रुग्णालयाबाहेर बघावयास मिळाली. मात्र आलिया दवाखान्यात अन् ...

Alia Bhatt appeared in a government hospital; What happened to Aliya? | सरकारी रुग्णालयात आईसोबत दिसली आलिया भट्ट; काय झाले असेल आलियाला?

सरकारी रुग्णालयात आईसोबत दिसली आलिया भट्ट; काय झाले असेल आलियाला?

लिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट नुकतीच तिची मम्मी सोनी राजदानसोबत एका सरकारी रुग्णालयाबाहेर बघावयास मिळाली. मात्र आलिया दवाखान्यात अन् तेही सरकारी रुग्णालयात का गेली असावी? असा सवाल आता तिच्या चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. शिवाय त्यांच्याकडून चिंताही व्यक्त केली जात आहे. पण आम्ही आलियाच्या चाहत्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी चिंता करायची गरज नाही. कारण आलिया अगदी ठणठणीत असून, सरकारी रुग्णालयाबाहेर ती तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगकरिता पोहोचली होती. आता तुम्ही म्हणाल की मग, आलियाची आई तिच्यासोबत काय करीत होती? तर आलियाची आईचीदेखील या चित्रपटात भूमिका असल्याने या दोघी एकत्र बघावयास मिळाल्या. 

दरम्यान, या चित्रपटातही सोनी राजदान आलियाच्या आईची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहेत. चित्रपटाच्या स्क्रिप्टनुसार शूटिंग एका सरकारी रुग्णालयात केली गेली. त्यामुळे या मायलेकी रुग्णालयाबाहेर बघावयास मिळाल्या. सध्या या दोघीही जम्मू येथील पहलगावमध्ये शूटिंगकरिता आहेत. याठिकाणी असलेल्या सरकारी रुग्णालयात शूटिंग केली जात आहे. जेव्हा या दोघी रुग्णालयात पोहोचल्या तेव्हा शेकडो चाहत्यांनी त्यांना बघण्यासाठी उपस्थिती लावली होती. आलियाच्या लूकविषयी असे सांगितले जात आहे की, ती शूटिंगकरिता मेकअप न करताच सेटवर पोहोचली होती. अशातही ती खूपच सुंदर दिसत होती. 



या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया पहिल्यांदाच तिच्या आईसोबत मोठ्या पडद्यावर झळकत आहे. शिवाय आलियासोबतचा विक्कीचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात तो एका आर्मी आॅफिसरच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे, तर आलिया एक काश्मिरी जासूसची भूमिका साकारत आहे. उपलब्ध माहितीनुसार हा चित्रपट १९७१ मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धावर आधारित आहे. हा चित्रपट ‘हरिंदर एस. सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या पुस्तकावर आधारित आहे. 

Web Title: Alia Bhatt appeared in a government hospital; What happened to Aliya?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.