'अल्फा'च्या सेटवर आलिया भट अन् बॉबी देओलमध्ये झाला वाद? 'हे' ठरलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:18 IST2026-02-13T12:18:02+5:302026-02-13T12:18:47+5:30

'अल्फा'च्या शूटिंगवेळी एक सीन करताना...

alia bhatt and bobby deol allegedly had argument on alpha set aditya chopra had to interfere | 'अल्फा'च्या सेटवर आलिया भट अन् बॉबी देओलमध्ये झाला वाद? 'हे' ठरलं कारण

'अल्फा'च्या सेटवर आलिया भट अन् बॉबी देओलमध्ये झाला वाद? 'हे' ठरलं कारण

अभिनेत्री आलिया भट आगामी 'अल्फा' सिनेमात दिसणार आहे. अल्फा हा वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्समधला महत्वाचा सिनेमात आहे. यामध्ये वुमन पॉवर दिसणार आहे. आलिया आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत तर बॉबी देओल खलनायक आहे. सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याचे अपडेट काही दिवसांपूर्वी आले होते. तर आता सिनेमाच्या सेटवर आलिया आणि बॉबीमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. 

१२३ तेलुगु रिपोर्टनुसार, 'अल्फा'च्या शूटिंगवेळी एक सीन करताना आलिया आणि बॉबी देओल यांच्याच वाद झाला. आलिया सीनमध्ये अनेकवेळा क्रिएटिव्ह बदल सुचवते. अशाच एका सीनमध्ये बॉबी देओलही होता. त्याला मात्र हे पटत नव्हतं आणि तो त्याच सीनवर ठाम होता. त्यांचा वाद इतका वाढला की दोघांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं. सेटवर तणावाचं वातावरण होतं. शेवटी निर्माता आदित्य चोप्राला मध्यस्थी करावी लागली. त्याने दोघांमध्ये बोलणं करुन दिलं आणि शूटिंग पूर्ण केलं. 

सेटवर खरंच असं काही घडलं का? यावर अधिकृत माहिती आलेली नाही. शिवाय सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याचा आदित्य चोप्राचा विचार आहे. यालाही आलियाकडून विरोध होत आहे. तिला सिनेमा थिएटरमध्येच प्रदर्शित झालेला हवा आहे. कारण हा वुमन सेंट्रिक सिनेमा आहे. यात हिरो नाही तर शिरोज आहेत. वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्समध्ये वुमन पॉवर, अॅक्शनचं प्रतिनिधित्व करणारा हा सिनेमा आहे त्यामुळे आलियाला सिनेमा थिएटरमध्येच प्रदर्शित व्हावा असं वाटतं. आता यावर आदित्य चोप्रा काय निर्णय घेणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. सिनेमाच्या रिलीजबद्दल अद्याप अपडेट आलेले नाही. 

Web Title : 'अल्फा' के सेट पर आलिया भट्ट और बॉबी देओल में हुई बहस?

Web Summary : रिपोर्ट के अनुसार, 'अल्फा' के सेट पर आलिया भट्ट और बॉबी देओल के बीच एक दृश्य के दौरान रचनात्मक मतभेद हुआ। आदित्य चोपड़ा के हस्तक्षेप की आवश्यकता पड़ी, आलिया के सुझावों से बॉबी असहमत थे। आलिया फिल्म की संभावित ओटीटी रिलीज का भी विरोध कर रही हैं, और सिनेमाघरों में रिलीज को प्राथमिकता दे रही हैं।

Web Title : Alia Bhatt and Bobby Deol Clash on 'Alpha' Set?

Web Summary : Reportedly, Alia Bhatt and Bobby Deol clashed on the set of 'Alpha' due to creative differences during a scene. The dispute, requiring Aditya Chopra's intervention, arose from Alia's suggestions, which Bobby disagreed with. Alia also opposes the film's potential OTT release, preferring a theatrical debut.