आलिया भट्टला 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर पुन्हा एकदा झाली दुखापत, रणबीर गेला मदतीला धावून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 16:59 IST2018-11-21T16:55:19+5:302018-11-21T16:59:32+5:30
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टला 'ब्रह्मास्त्र' शूटिंग दरम्यान पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. आलियाला रणबीर कपूर लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेला. 'ब्रह्मास्त्र' शूटिंगच्यावेळी आलिया दुसऱ्यांदा दुखापत झाली आहे.

आलिया भट्टला 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर पुन्हा एकदा झाली दुखापत, रणबीर गेला मदतीला धावून
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टला 'ब्रह्मास्त्र' शूटिंग दरम्यान पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. आलियाला रणबीर कपूर लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेला. 'ब्रह्मास्त्र' शूटिंगच्यावेळी आलिया दुसऱ्यांदा दुखापत झाली आहे. याआधी मार्चमध्ये बुलगेरियामध्ये शूटिंग दरम्यानदेखील आलिया दुखापत झाली होती. त्यावेळी आलियाच्या खांद्याला लागले होते.
सध्या आलिया आणि रणबीर 'ब्रह्मास्त्र'चे डोंगरीमध्ये करतायेत. एका सीनच्या शूटिंग दरम्यान आलियाला दुखापत झाली. त्यावेळी सेटवर रणबीर कपूरसुद्धा हजर होता, तो लगेच तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. सध्या आलिया ठिक आहे. डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. (‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिले गेले आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या. आलिया नीतू सिंग यांनाही पसंत असल्याचेही कानावर येतेय.) ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग नाताळ २०१९ मध्ये रिलीज होणार आहे. या आगामी चित्रपटांत रणबीरचा अॅक्शन अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.