Alia Bhatt : आलिया भट संदर्भात मोठी बातमी आली समोर, बाळाच्या जन्मानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 13:17 IST2022-10-17T13:16:35+5:302022-10-17T13:17:16+5:30
अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) लवकरच आई होणार आहे.

Alia Bhatt : आलिया भट संदर्भात मोठी बातमी आली समोर, बाळाच्या जन्मानंतर...
बॉलिवूडची गंगूबाई म्हणजेच अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) लवकरच आई होणार आहे. आलिया आणि रणबीर १४ एप्रिलला लग्नगाठ बांधली. तर जूनमध्ये आलियाने चाहत्यांना खुशखबर दिली. मागील काही दिवसांपासून आलिया आगामी चित्रपटाच्या चित्रीकरण आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच आता आलिया भटने एक मोठा निर्णय घेतला आहे. बाळंतपणानंतर आलिया मोठा ब्रेक घेणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आलिया भट तिच्या बाळासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतित करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळेच तिने बाळाच्या जन्मानंतर मोठा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आलियाने वर्षभर मॅटरनिटी लीव्हवर जाण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आलियाचा नुकताच ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्र-मंडळी उपस्थित होते. आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
आलिया भटच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने तिच्या आगामी 'हार्ट ऑफ स्टोन' आणि करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आलियासारखं रणबीरदेखील चित्रपटातून ब्रेक घेणार असल्याचे म्हटले जात आहे.