संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'मधील आलिया भटचा लूक समोर, दिसतेय रेट्रो क्वीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 12:34 IST2025-10-18T12:33:39+5:302025-10-18T12:34:13+5:30
आलिया भटचा सेटवरील फोटो लीक

संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'मधील आलिया भटचा लूक समोर, दिसतेय रेट्रो क्वीन
संजय लीला भन्साळींचा आगामी 'लव्ह अँड वॉर' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. रणबीर कपूर, आलिया भट आणि विकी कौशल अशी तिकडी सिनेमात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. नुकताच आलिया भटचा सिनेमातील लूक समोर आला आहे. सेटवरुन तिचे काही फोटो लीक झाले आहेत. आलिया पहिला लूक व्हायरल होत असून लक्ष वेधून घेत आहे.
'लव्ह अँड वॉर'मध्ये ६० ते ७० दशकाचा काळ दिसत आहे. सिल्वर रंगाच्या साडीमध्ये आलिया भटचा फोटो समोर आला आहे. तिचा रेट्रो लूक लक्ष वेधून घेतल आहे. जुनी हेअरस्टाईल, आय मेकअप यात ती खूपक क्लासी आणि एलिगंट दिसत आहे. सिनेमाची थीम रेट्रो स्पेशल आहे. १९६४ च्या क्लासिक 'संगम' सिनेमावरुन प्रेरणा घेत 'लव्ह अँड वॉर' हा इमोशनल ड्रामा बनवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सिनेमात प्रेम, त्याग आणि अहंकाराच्या भावनेला दाखवण्यात येणार आहे.
भन्साळींचा सेट नेहमी भव्यता, कला आणि संगीताचं अद्भूत दर्शन घडवतो. त्यामुळे चाहत्यांना सिनेमाकडून अशाच प्रकारची अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूरने सिनेमावर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणालेला, "१७ वर्षांनंतर भन्साळींसोबत पुन्हा काम करणं हा खूपच खास अनुभव आहे. संजय सरांसोबत काम करणं कोणत्याही कलाकाराचं स्वप्न असंत. भावना, संगीत आणि भारतीय संस्कृतीची त्यांना जाण आहे. त्यांच्या सेटवरील प्रत्येक सीन अद्भूत असतो."
'लव्ह अँड वॉर'चं शूट सध्या मुंबईत सुरु आहे. तिघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सिनेमाच्या टीझर आणि रिलीज डेटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.