आलिया भटने रणबीर कपूरसोबतच्या नात्याबाबत केला हा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 18:59 IST2019-01-02T18:54:36+5:302019-01-02T18:59:44+5:30
आलिया भटने 'राझी' चित्रपटातून रसिकांना चांगलीच भूरळ पाडली. या सिनेमात आलियाने गुप्तहेरची भूमिका साकारली होती. आता ती 'गली ब्वॉय' सिनेमात झळकणार आहे.

आलिया भटने रणबीर कपूरसोबतच्या नात्याबाबत केला हा खुलासा
बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भटने 'राझी' चित्रपटातून रसिकांना चांगलीच भूरळ पाडली. या सिनेमात आलियाने गुप्तहेरची भूमिका साकारली होती. आता ती 'गली ब्वॉय' सिनेमात झळकणार असून लवकरच ती या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरूवात करणार आहे. या चित्रपटाचे आतापर्यंत तीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त आलिया सध्या रणबीर कपूरसोबत अफेयर मध्ये असल्याची चर्चा रंगली आहे.
आलिया व रणबीरच्या नात्यावर उघडपणे चर्चा सोनम कपूर व आनंद आहूजा यांच्या रिसेप्शन पार्टीत ते दोघे एकत्र पोहचले तेव्हापासून सुरू झाली. त्यानंतर एका मुलाखतीत रणबीर कपूरने रिलेशनशीपमध्ये असल्याचे कबूल केले. मात्र कोणाचे नाव सांगितले नाही. आता आलियाने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली की, 'माझे मांजरींवर खूप प्रेम आहे आणि मीदेखील स्वतः मांजरीसारखी आहे. मला जे वाटते तेच मी नेहमी करते. आलियाने खूप मांजरी पाळल्या असून त्यांच्यासोबत ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.'
या मुलाखतीदरम्यान आलियाला रणबीर कपूरसोबतच्या नात्याबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की, 'माझ्या खासगी जीवनात मी प्रामाणिक आहे आणि मला यावर बोलणे पसंत नाही. मला या गोष्टीमुळे अजिबात फरक पडत नाही. मला खासगी जीवनावर बोलणे आवडत नाही कारण त्यामुळे लक्ष भरकटले जाते. हे नाते माझ्या जीवनातील एक भाग आहे. तिने पुढे सांगितले की, जे काही आहे ते खूप छान आहे. तुम्ही म्हणू शकता की हे थोडेफार तसेच आहे जसे माझ्या जीवनात माझ्या मांजरी आहेत. ज्यांना मला नेहमी सुरक्षित ठेवायचे आहे आणि एडवर्ड (आलियाची मांजर) सारखे आता सोशल मीडियावर येण्यासाठी तयार नाही.'