आलिया भट माझी मुलगी? अफवांवर पूजा भटचा खुलासा, म्हणाली, "आपल्या देशात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 11:26 IST2023-09-13T11:25:55+5:302023-09-13T11:26:58+5:30
महेश भट आणि सोनी राजदान यांची मुलगी आलिया भट सावत्र बहीण पूजा सारखीच दिसते.

आलिया भट माझी मुलगी? अफवांवर पूजा भटचा खुलासा, म्हणाली, "आपल्या देशात..."
बॉलिवूडमध्ये भट कुटुंब अनेक कारणांनी चर्चेत असतं. महेश भट (Mahesh Bhat) आणि पूजा भट (Pooja Bhat) या बापलेकीची तर ९० च्या दशकात जोरदार चर्चा होती. पूजा भट तेव्हाची आघाडीची अभिनेत्री होती. महेश भट आणि पूजा भट यांचा एका कॅलेंडरवरील लिपलॉक फोटो खूप व्हायरल झाला होता. तसंच महेश भट आणि सोनी राजदान यांची मुलगी आलिया भट सावत्र बहीण पूजा सारखीच दिसते. त्यामुळे ती खरंतर पूजा आणि महेश यांची मुलगी आहे अशा अफवा पसरवल्या गेल्या होत्या. या अफवांवर पूजा भटने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत पूजा भट म्हणाली, 'जे अशा गोष्टी पसरवतात त्यांची खरंतर नीयत कळते. आपल्या देशात तर या गोष्टी सर्रास होतात. कोणाबद्दल त्यांच्या आई, बहीण, वहिनीसोबत नातं जोडण्यास सुरुवात केली तर कशी प्रतिक्रिया द्याल. अशा गोष्टींवर बोलायची सुद्धा लाज वाटते. हे खूपच घाणेरडं आहे.'
दरम्यान २०१२ मध्ये 'कॉफी विद करण' च्या एपिसोडमध्ये आलियाने या अफवांचा खुलासा केला होता. करण जोहरने तिला आतापर्यंत ऐकलेली स्वत:बद्दलची सर्वात वाईट अफवा कोणती असं विचारलं होतं. यावर आलियाने मी पूजा आणि महेश भट यांची मुलगी आहे असं उत्तर दिलं होतं.
आलिया ही महेश भट आणि सोनी राजदान यांची मुलगी आहे. तर पूजा भटची सावत्र बहीण आहे. पूजा भट ही महेश भट यांची पहिली पत्नी किरण भट यांची मुलगी आहे. पूजा नुकतीच 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये दिसली होती.