आलिया अन् श्रद्धाला परिणीती चोप्राचा असाही टोमणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 11:31 IST2017-04-07T06:01:00+5:302017-04-07T11:31:00+5:30

मला आॅटोट्यून नको होती. मला अभिमान वाटतो की, मी गाणे शिकलेय आणि त्यामुळे मी माझ्या ओरिजनल आवाजात गायलेयं, असे परिणीती म्हणाली. आता परिणीती अचानकपणे आॅटोट्यूनबद्दल का बोलली, हे मात्र कळायला मार्ग नाही.

Alia and Shraddha Parineeti Chopra's tears of joy! | आलिया अन् श्रद्धाला परिणीती चोप्राचा असाही टोमणा!

आलिया अन् श्रद्धाला परिणीती चोप्राचा असाही टोमणा!

िणीती चोप्रा अलीकडे आलिया भट्ट, श्रद्धा कपूरच्या रांगेत जावून बसली. होय,‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटातील परिणीतीचे डेब्यू साँग ‘मन के हम यार नहीं...’ रिलीज झाले आणि  याचसोबत परिणीतीची तुलनाही सुरु झाली. आलिया आणि श्रद्धा चांगल्या गातात की, परिणीती यावर चर्चा  रंगली. पण खरे सांगायचे तर परिणीतीला या चर्चेने काहीही फरक पडत नाही. गाणे गाताना आलिया व श्रद्धापेक्षा स्वत:ला तू कशाप्रकारे वेगळे दाखवण्याचा प्रयत्न केलास? असा प्रश्न परिणीतीला विचारण्यात आला.


ALSO READ : परिणीती चोप्राचे गाणे ऐकून चक्क झोपी गेली ‘गोलमाल4’ टीम!

यावर परिणीतीने क्षणाचाही विचार न करता नकारार्थी उत्तर दिले.  स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे भासवण्याच्या भानगडीत मला काहीही इंटरेस्ट नाही. किंबहुना मी याबद्दल विचारही करत नाही, अशी ती खाडकन बोलून गेली.  दुसºयापेक्षा स्वत:ला श्रेष्ठ वा वेगळे भासवावे, असा साधा विचारही माझ्या मनात येत नाही. म्युझिक हा माझ्या आयुष्याचा भाग आहे. जेव्हा मी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये माईकपुढे उभे राहिले, तेव्हा केवळ आणि केवळ गाण्यावर फोकस केला.
तांत्रिकदृष्टया अचूक गाण्यावर मी भर दिला. मला आॅटोट्यून नको होती. मला अभिमान वाटतो की, मी गाणे शिकलेय आणि त्यामुळे मी माझ्या ओरिजनल आवाजात गायलेयं. आॅटोट्यून वापरली असतील तर ती माझ्या संगीत प्रशिक्षणाला चपराक मारण्यासारखे झाले असते, असे परिणीती म्हणाली.  आता परिणीती अचानकपणे आॅटोट्यूनबद्दल का बोलली, हे मात्र कळायला मार्ग नाही. मी माझ्या खºया आवाजात गायले आहे, हे तिला सांगायचे होते की, श्रद्धा व आलियाने गायलेली गाणी आॅटोट्यून्ड होती, हे तिला सांगायचे होते, हे तिलाच ठाऊक.  तुम्हीच याचा अंदाज लावलेला बरा! 

Web Title: Alia and Shraddha Parineeti Chopra's tears of joy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.