आलिया -सिद्धार्थ नॉट अ कपल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 19:38 IST2016-09-19T13:57:40+5:302016-09-19T19:38:42+5:30
आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात सध्या सगळे काही ‘आॅलवेल’ नसल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. आलिया व सिद्धार्थने एकमेकांपासून ...

आलिया -सिद्धार्थ नॉट अ कपल?
आ िया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात सध्या सगळे काही ‘आॅलवेल’ नसल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. आलिया व सिद्धार्थने एकमेकांपासून ब्रेक घेतला असल्याची सध्या चर्चा आहे. तूर्तास तरी स्वत:ला कपल म्हणवून घ्यायला दोघेही तयार नाहीत. नुकत्याच झालेल्या ‘ड्रिम टीम टूर’दरम्यानही आलिया व सिद्धार्थ एकमेकांपासून सावध अंतर राखताना दिसले. आता यामागचे नेमके कारण ठाऊक नाही. पण सूत्रांच्या मते, या ब्रेकदरम्यान सिद्धार्थ व आलिया दोघांनीही परस्परांना पुरेसी स्पेस देण्याचे शिवाय या काळात स्वत:च्या पर्सनल व प्रोफेशनल अशा दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. सिद्धार्थला त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. ‘बार बार देखो’ आपटल्यानंतर तर करिअरवर फोकस करणे त्याच्यासाठी आणखीच जास्त आवश्यक झाले आहे. याऊलट आलिया ही सुद्धा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये सध्या बिझी आहे. ‘डिअर जिंदगी’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ असे चित्रपट तिच्या हातात आहे. एकंदर काय तर करिअरच्या या महत्त्वपूर्ण वळणावर आलिया व सिद्धार्थने केवळ आणि केवळ कामावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला विचाराल तर निश्चितपणे हा शहाणपणाचा निर्णय आहे. तुम्हाला काय वाटतं?