अली जफरचा भाऊ करतोय बॉलिवूड डेब्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 17:06 IST2016-09-07T11:36:20+5:302016-09-07T17:06:20+5:30
पाकिस्तानी अभिनेता अली जफर अनेक बॉलिवूड चित्रपटात दिसला. केवळ एवढेच नाही तर आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने भारतीय प्रेक्षकांची मनेही ...

अली जफरचा भाऊ करतोय बॉलिवूड डेब्यू!
प किस्तानी अभिनेता अली जफर अनेक बॉलिवूड चित्रपटात दिसला. केवळ एवढेच नाही तर आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने भारतीय प्रेक्षकांची मनेही जिंकलीत. आता त्याचा भाऊ डेन्यल जफर हा बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज झाला आहे. केवळ तयारच नाही तर एका मोठ्या बॅनरच्या चित्रपटातून तो बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची खबर आहे. होय, यशराज बॅनरच्या चित्रपटातून डेन्यल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यशराज बॅनरने डेन्यलसाठी एक चित्रपट प्लान केला आहे. हबीब फैजल याचे दिग्दर्शक असतील. यात डेन्यलश्विाय अन्य पाच नवे चेहरे असतील. यात दोन विदेशी आणि एक नॉर्थ ईस्टची मुलगी असेल. यात डेन्यल एका रोमॅन्टिक भूमिकेत दिसेल. चित्रपटाची कथा काही गुन्हेगार आणि एका म्युझिक बँडच्या अवतीभवती फिरणारी असेल. डेन्यल एक सिंगर आहे. शिवाय तो गिटारही चांगला वाजवतो. २०१४ मध्येही यशराज बॅनर डेन्यलला लॉन्च करणार असल्याची बातमी आली होती. यावेळी डेन्यल ‘किल दिल’च्या प्रीमियरमध्ये दिसला होता. अर्थात त्यावेळी ही डेन्यलची लॉटरी हुकली होती. पण यावेळी मात्र डेन्यलचे भाग्य फळफळले म्हणायचे...!!
![]()