"अक्षय खन्ना माझा क्रश, तो खूप क्यूट..."; करीना कपूरचं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाली होती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:59 IST2025-12-10T17:56:58+5:302025-12-10T17:59:23+5:30
अक्षय खन्नाबद्दल करीना कपूरने वक्तव्य केलं होतं. ते आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. काय म्हणाली होती करीना?

"अक्षय खन्ना माझा क्रश, तो खूप क्यूट..."; करीना कपूरचं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाली होती?
सध्या बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या 'धुरंधर' या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील खतरनाक डाकू 'रहमान'ची भूमिका आणि अक्षयने केलेला डान्स खूप गाजत आहे. याच निमित्ताने अभिनेत्री करीना कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने उघडपणे अक्षय खन्ना माझा क्रश असल्याचं कबूल केलं होतं आणि त्याचं भरभरून कौतुक केले होते.
अक्षय खन्नासाठी काय म्हणाली करीना?
हा व्हायरल व्हिडिओ २००४ मधील 'हलचल' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. त्यावेळी करीना कपूरने अक्षय खन्नाबद्दलची तिच्या भावना व्यक्त करताना सांगितले होते की, "मी अक्षयचा 'हिमालय पुत्र' हा चित्रपट किमान २० वेळा पाहिला आहे. त्या वेळी मी शाळेत शिकत होते आणि अक्षय खन्ना हा प्रत्येक मुलीचा क्रश होता. मी देखील त्याच्यामागे अक्षरशः वेडी होते."
ती पुढे म्हणाली, "अक्षयचं व्यक्तिमत्व खूप आकर्षक असून तो एक उत्कृष्ट माणूस आहे. तो एक शानदार अभिनेता आहे. हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी तो सर्वात परफेक्ट व्यक्ती आहे. तो खूप क्यूट आहे!" अशा शब्दांत करीनाने अक्षय खन्नाची प्रशंसा केली होती.
'हलचल'मध्ये एकत्र केले काम
विशेष म्हणजे, अक्षय खन्ना आणि करीना कपूर यांनी प्रियदर्शन दिग्दर्शित 'हलचल' (२००४) या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट मल्याळम चित्रपट 'गॉडफादर'चा हिंदी रिमेक होता. या चित्रपटात अक्षय आणि करीनासोबत सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अर्शद वारसी, अमरीश पुरी आणि परेश रावल यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
सध्याचे वर्कफ्रंट
सध्या अक्षय खन्ना 'धुरंधर'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. याव्यतिरिक्त, तो लवकरच 'महाकाली' चित्रपटात शुक्राचार्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, करीना कपूर खान लवकरच मेघना गुलजार दिग्दर्शित 'दायरा' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यात तिच्यासोबत पृथ्वीराज सुकुमारन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.