​अक्षय एकाच चित्रपटात साकारणार पाच भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2016 20:53 IST2016-09-12T15:23:58+5:302016-09-12T20:53:58+5:30

‘एअरलिफ्ट’,‘हाऊसफुल3’ आणि ‘रूस्तम’ असे एकापाठोपाठ एक हिट दिल्यानंतर अक्षय कुमारची डिमान्ड चांगलीच वाढलीय. सध्या अक्षय ‘जॉली एलएलबी2’मध्ये बिझी आहे. ...

Akshay will play five roles in the same film? | ​अक्षय एकाच चित्रपटात साकारणार पाच भूमिका?

​अक्षय एकाच चित्रपटात साकारणार पाच भूमिका?

अरलिफ्ट’,‘हाऊसफुल3’ आणि ‘रूस्तम’ असे एकापाठोपाठ एक हिट दिल्यानंतर अक्षय कुमारची डिमान्ड चांगलीच वाढलीय. सध्या अक्षय ‘जॉली एलएलबी2’मध्ये बिझी आहे. यानंतर ‘रोबोट2.0’ आणि ‘क्रॅक’ या चित्रपटांमध्येही अक्षय दिसणार आहे.आता यात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. हा चित्रपट आहे, ‘फाईव्ह’. होय, ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय एक नाही, दोन नाही तर पाच व्यक्तिरेखा साकारणार आहे. यापूर्वी अक्षय डबलरोलमध्ये दिसला. पण ‘फाईव्ह’मध्ये तो पहिल्यांदा  पाच व्यक्तिरेखा साकारणार आहे. यापूर्वी कमल हासन एका चित्रपटात दहा वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. संजीव कुमार यांनी नऊ तर गोविंदाने ‘हद कर दी आपने’मध्ये सहा वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या. प्रियांका चोप्रा हिने एकाच चित्रपटात तब्बल बारा वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. आता या रांगेत अक्षयचा क्रमांक लागणार आहे. तेव्हा बघूच!!

Web Title: Akshay will play five roles in the same film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.