अक्षय पुन्हा एकदा दिसणार खलनायकाच्या भूमिकेत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 15:51 IST2016-08-02T10:21:09+5:302016-08-02T15:51:09+5:30

 नुकताच रिलीज झालेल्या ‘ढिशूम’ चित्रपटात अक्षय खन्ना हा खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. आता तो पुन्हा एकदा १९६९चा बी.आर.चोप्रा यांच्या ...

Akshay plays a villain again! | अक्षय पुन्हा एकदा दिसणार खलनायकाच्या भूमिकेत !

अक्षय पुन्हा एकदा दिसणार खलनायकाच्या भूमिकेत !

 
ुकताच रिलीज झालेल्या ‘ढिशूम’ चित्रपटात अक्षय खन्ना हा खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. आता तो पुन्हा एकदा १९६९चा बी.आर.चोप्रा यांच्या ‘इत्तेफाक’च्या रिमेकमध्ये निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार आहे. १९६९ च्या चित्रपटात राजेश खन्ना आणि नंदा होते.

सुत्रांनुसार, चित्रपटाची कथा लिहून पूर्ण झाली असून थोड्याच दिवसांत चित्रपटाची शूटींगही सुरू होणार असल्याचे कळते आहे. चोप्रा यांचा नातू अभय चोप्रा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि सोनाक्षी सिन्हा हे दिलीप रॉय आणि रेखा यांच्या भूमिकेत दिसतील. नवाजुद्दीन सिद्दीकी हा इन्स्पेक्टर कर्वेची भूमिका करणार असल्याचे कळाले होते. वेल, अद्याप काही गोष्टी गुलदस्त्यातच ठेवण्यात आल्या आहेत. 

Web Title: Akshay plays a villain again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.