​अक्षय, माधुरी व रितेश झाले..‘सैराट’मय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 20:57 IST2016-05-28T15:27:53+5:302016-05-28T20:57:53+5:30

सैराट चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत मराठी चित्रपटाची एक नवी ओळख निर्माण झाली आहे. या चित्रपटाची जादू बॉलीवूड स्टार यांच्यावरही दिसून येत आहे.

Akshay, Madhuri and Ritesh became .. | ​अक्षय, माधुरी व रितेश झाले..‘सैराट’मय

​अक्षय, माधुरी व रितेश झाले..‘सैराट’मय

राट चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत मराठी चित्रपटाची एक नवी ओळख निर्माण झाली आहे. या चित्रपटाची जादू बॉलीवूड स्टार यांच्यावरही दिसून येत आहे. 


नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमानं मराठी चित्रपट सृष्टीतले सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या सिनेमाला फक्त मराठीच नाही तर बॉलीवूडनंही डोक्यावर घेतलं आहे. 

सैराट चित्रपटाबरोबरच त्याची गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. या चित्रपटाच्या झिंगाट या गाण्यावर माधुरी दीक्षित, रितेश देशमुख आणि अक्षय कुमारनं डान्स करून सैराटमय झाले.

अँड टीव्हीवरच्या सो यू थिंक यू कॅन डान्स या शोमध्ये रितेश देशमुख आणि अक्षय कुमारनं हाऊसफूल 3 या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी हजेरी लावली. त्यावेळी या तिघांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. 

Web Title: Akshay, Madhuri and Ritesh became ..