अक्षयकुमारने खांद्यावर गोंदला ‘या’ नावाचा टॅटू; केपटाउनमधून शेअर केला फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 19:25 IST2017-12-28T13:55:30+5:302017-12-28T19:25:37+5:30
बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षयकुमार सध्या त्याच्या परिवारासोबत केपटाउन येथे सुट्या एन्जॉय करीत आहे. याचदरम्यान अक्षयने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो ...
.jpg)
अक्षयकुमारने खांद्यावर गोंदला ‘या’ नावाचा टॅटू; केपटाउनमधून शेअर केला फोटो!
ब लिवूडचा सुपरस्टार अक्षयकुमार सध्या त्याच्या परिवारासोबत केपटाउन येथे सुट्या एन्जॉय करीत आहे. याचदरम्यान अक्षयने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केली असून, त्याच्या चाहत्यांना तो चांगलाच भावत आहे. या फोटोमध्ये अक्षय एका कुत्र्यासोबत बघावयास मिळत आहे. याच फोटोमध्ये अक्षयच्या खाद्यांवर टॅटू बघावयास मिळत आहे. हा टॅटू ‘टिना’ नावाचा आहे. टिना अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिचे निक नेम आहे. या फोटोला अक्षयने कॅप्शन देताना लिहिले की, ‘या गुड बॉयबरोबर साउथ आफ्रिकेत कोवळ्या उन्हाचा आनंद घेताना’
अक्षयचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २६ जानेवारी २०१८ रोजी रिलीज होणार आहे. अक्षय केपटाउनमधून परताच या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होणार आहे. चित्रपटात अक्षयसोबत सोमन कपूर, राधिका आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २ मिनीट २५ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये पॅडमॅन (अक्षयकुमार) महिलांना सॅनेटरी नॅपकिनचे महत्त्व सांगताना दिसत आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोनी पिक्चर्स यांनी यू-ट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. या चित्रपटाला आतापर्यंत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
आर. बाल्की दिग्दर्शित हा चित्रपट अरूणाचलम मुरूगानाथम यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाची प्रोड्युसर म्हणून ट्विंकल खन्नाने जबाबदारी स्वीकारली आहे. प्रोड्युसर म्हणून ट्विंकल या चित्रपटातून डेब्यू करीत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अक्षयने केपटाउनमधील त्याच्या एका जुन्या मित्राचा फोटो शेअर केला होता. त्याच्या या स्पेशल मित्राबरोबर त्याची लहान मुलगी नितारा धमालमस्ती करताना बघावयास मिळत होती.

}}}} ">Deep blue sea and skies to match, long conversations and fishing for a catch :) pic.twitter.com/sFZbQp8qHU— Akshay Kumar (@akshaykumar) December 26, 2017
Deep blue sea and skies to match, long conversations and fishing for a catch :) pic.twitter.com/sFZbQp8qHU— Akshay Kumar (@akshaykumar) December 26, 2017