​अक्षय कुमार साकारणार गुलशन कुमार यांची भूमिका मोगल या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 10:16 IST2017-03-15T04:46:26+5:302017-03-15T10:16:26+5:30

जॉली एल.एल.बी 2 या अक्षय कुमारच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नुकतीच चांगलीच कमाई केली. या चित्रपटानंतर याच चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष ...

Akshay Kumar's role in the role of Gulshan Kumar in the movie Mogal | ​अक्षय कुमार साकारणार गुलशन कुमार यांची भूमिका मोगल या चित्रपटात

​अक्षय कुमार साकारणार गुलशन कुमार यांची भूमिका मोगल या चित्रपटात

ली एल.एल.बी 2 या अक्षय कुमारच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नुकतीच चांगलीच कमाई केली. या चित्रपटानंतर याच चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यासोबत अक्षय कुमार एका चित्रपटात झळकणार आहे. अक्षयने नुकतीच पॅ़डमॅन या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून या चित्रपटाच्या सेटवर नुकताच तो त्याची पत्नी ट्विंकल खन्नासोबत दिसला होता. 
अक्षय कुमारचा मोगल हा आगामी चित्रपट गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. या चित्रपटाची निर्मितीदेखील गुलशन कुमार यांचीच कंपनी टी-सीरिज करणार आहे. अक्षय या चित्रपटात गुलशन कुमार यांच्या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गुलशन कुमार यांची हत्या भर दिवसा अंधेरीतील एका मंदिराच्या बाहेर झाली होती. गुलशन कुमार यांचे प्रतिस्पर्धी संगीतकार नदीम हे या हत्येत आरोपी होते. या हत्येमुळे कशाप्रकारे व्यवसायिक, सेलिब्रेटी यांना खंडणीसाठी अंडरवर्ल्डकडून धमक्या दिल्या जात आहेत, हे समोर आले होते.
अक्षय कुमार या चित्रपटात गुलशन कुमार यांची भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे. याविषयी तो सांगतो, "गुलशन कुमार यांच्यासोबत मला माझ्या सौंगध या पहिल्या चित्रपटापासूनच काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांना मी खूप चांगल्याप्रकारे ओळखत होतो. आम्ही दोघेही सारख्याच पार्श्वभूमीतून आल्यामुळे आमच्यात अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे. त्यामुळे गुलशन कुमार यांना पडद्यावर साकारण्यास मी खूप उत्सुक आहे." तर या चित्रपटाते दिग्दर्शक सुभाष कपूर सांगतात, "मी माझ्या टीमला नेहमीच सांगायचो की, मला गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवायला आवडेल. त्यामुळे विक्रम मल्होत्रा यांनी ज्यावेळी मला या चित्रपटाविषयी सांगितले त्यावेळी माझ्या कानावर माझा विश्वासच बसत नव्हता." 
मोगल या चित्रपटाचा पहिला लूक टी-सिरिजने ट्विटरद्वारे लोकांच्या समोर आणला आहे आणि ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "संगीताचे बादशहा गुलशन कुमार यांची कथा लोकांसमोर आणण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष कपूर करणार आहे तर निर्मिती सुदेश कुमारी यांची आहे." 
या चित्रपटाच्या पहिल्या लूकमध्ये एका कॅसेटच्या पृष्ठावर अक्षय कुमारचे स्केच आपल्याला पाहायला मिळत आहे. 

Web Title: Akshay Kumar's role in the role of Gulshan Kumar in the movie Mogal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.