​अक्षय कुमारच्या ‘केसरी’चा फर्स्ट लूक आला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 13:40 IST2018-01-05T08:10:24+5:302018-01-05T13:40:24+5:30

गतवर्षाप्रमाणे हे नवे वर्षही अक्षय कुमारसाठी आनंदमयी ठरणार आहे. कारण रिलीजपूर्वी त्याचा आगामी चित्रपट ‘पॅडमॅन’ला लोकांचे भरपूर प्रेम मिळतेय. ...

Akshay Kumar's 'Kesari' first look! | ​अक्षय कुमारच्या ‘केसरी’चा फर्स्ट लूक आला!

​अक्षय कुमारच्या ‘केसरी’चा फर्स्ट लूक आला!

वर्षाप्रमाणे हे नवे वर्षही अक्षय कुमारसाठी आनंदमयी ठरणार आहे. कारण रिलीजपूर्वी त्याचा आगामी चित्रपट ‘पॅडमॅन’ला लोकांचे भरपूर प्रेम मिळतेय. सध्या अक्षय ‘पॅडमॅन’च्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. सोबतच त्याच्या आणखी एका नव्या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘केसरी’. आज ‘केसरी’चा फर्स्ट लूक जारी झाला.


ALSO READ : पाहा, ‘पॅडमॅन’चे ‘हू ब हू’ गाणे!

अक्षयने स्वत: त्याच्या टिष्ट्वटर अकाऊंटवर ‘केसरी’चा फर्स्ट लूक जारी केला.  हा फोटो तुमच्यासोबत शेअर करताना मला अभिमान वाटतोय. नव्या वर्षाची सुरुवात ‘केसरी’सोबत करतोयं. हा माझा मोठा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट मी माझ्यातील सगळी ऊर्जा खर्चून बनवणार, असे अक्षयने लिहिले आहे. ‘केसरी’च्या फर्स्ट लूकमध्ये अक्षय कुमार डोक्यावर पगडी आणि वाढलेली दाढी अशा सरदार लूकमध्ये दिसतो आहे. निश्चितपणे हा लूक त्याच्यावर चांगलाच सूट झालाय. गतवर्षीचं ‘केसरी’ची घोषणा झाली होती. त्यावेळी सलमान खान आणि करण जोहर हा चित्रपट प्रोड्यूस करणार, असे म्हटले गेले होते. पण नंतर सलमानने या प्रोजेक्टमधून हात मागे घेतला. आता करण जोहर हा एकटाच या चित्रपटाचा निर्माता असेल. अनुराग सिंह हा चित्रपट दिग्दर्शित करेल.
‘केसरी’चे कथानक  १८९७ च्या लढाईत  वीरमरण आलेल्या २१ शीखांवर आधारलेले असल्याचे कळते. ही लढाई ‘बॅटल आॅफ सारागढी’ नावाने ओळखले जाते. .  या लढाईत ब्रिटीश आर्मीच्या शिख रेजिमेंटच्या  २१ शिपायांनी प्राणांचे बलिदान देत तब्बल दहा हजार अफगाणींना रोखून धरले होते.  याच लढाईवर दिग्दर्शक राजकुमार संतोषी  ‘बॅटल आॅफ सारागढी’  हा चित्रपट साकारत आहेत.  या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. 
‘पॅडमॅन’ व ‘केसरी’ शिवाय अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ हा सिनेमाही याचवर्षी रिलीज होणार आहे.

Web Title: Akshay Kumar's 'Kesari' first look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.