अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल ५'ची तारीख पुढे ढकलली, निर्मात्यांची अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 01:45 PM2023-12-04T13:45:40+5:302023-12-04T14:01:41+5:30

'हाऊसफुल 5' साठी अक्षयच्या चाहत्यांना आता आणखी वाट पाहायला लागणार आहे.

Akshay Kumar's Housefull 5 release date pushed to 2025 | अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल ५'ची तारीख पुढे ढकलली, निर्मात्यांची अधिकृत घोषणा

अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल ५’ची तारीख पुढे ढकलली, निर्मात्यांची अधिकृत घोषणा

अभिनेता अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5' या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. याचे दिग्दर्शन दिग्दर्शन तरुण मनसुखानी करत आहेत. हा सिनेमा २०२४ मध्ये रिलीज करण्याचा प्लॅन होता. पण काही कारणास्तव चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.  साजिद नाडियादवाला यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 

साजिद नाडियाडवाला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहले की, 'हाऊसफुलच्या सर्व भागांना मिळालेल्या यशाचे श्रेय प्रेक्षकांना जाते. 'हाऊसफुल 5' लादेखील असेच प्रेम मिळेल ही आशा आहे.  चित्रपटाची कथाही उत्तम असून प्रेक्षकांना व्हिएफएक्सही पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला  उत्तम सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी आम्ही रिलीजची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे'.

अक्षय कुमार स्टारर 'हाऊसफुल 5' हा सिनेमा 6 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करत आहेत. स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर साजिद निर्मित चित्रपटात अक्षय कुमारसह, जॉन अब्राहम आणि रितेश देशमुख असल्याची चर्चा आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप अधिकृत कलाकारांची घोषणा केलेली नाही.

हाऊसफुल फ्रँचायझीचे आतापर्यंत चार भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पहिला भाग 2010 मध्ये, दुसरा भाग 2012 मध्ये, तिसरा भाग 2016 मध्ये, चौथा भाग 2019 मध्ये, तर ‘हाऊसफुल 5’ प्रेक्षकांच्या भेटीला 6 जून 2025 मध्ये येणार आहे. अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, नुकताच त्याचा 'मिशन राणीगंज' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 
 

Web Title: Akshay Kumar's Housefull 5 release date pushed to 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.