मुलगी निताराच्या अ‍ॅक्शनमुळे खिलाडी अक्षयकुमारची झाली पंचाईत, पहा व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 17:46 IST2017-07-26T12:12:00+5:302017-07-26T17:46:29+5:30

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक बिझी अभिनेत्यांमध्ये अक्षयकुमार याचे नाव घेतले जाते. कारण त्याच्याकडे सध्या प्रचंड काम असून, तो कुठल्या ना कुठल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतो.

Akshay Kumar's daughter is under the influence of daughter Nitara, see video! | मुलगी निताराच्या अ‍ॅक्शनमुळे खिलाडी अक्षयकुमारची झाली पंचाईत, पहा व्हिडीओ!!

मुलगी निताराच्या अ‍ॅक्शनमुळे खिलाडी अक्षयकुमारची झाली पंचाईत, पहा व्हिडीओ!!

लिवूडमध्ये सर्वाधिक बिझी अभिनेत्यांमध्ये अक्षयकुमार याचे नाव घेतले जाते. कारण त्याच्याकडे सध्या प्रचंड काम असून, तो कुठल्या ना कुठल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतो; मात्र अशातही तो आपल्या परिवाराला पुरेसा वेळ देतो. आता हेच बघा ना, काल अक्षय मुलगी नितारा हिला घेऊन गार्डनमध्ये गेला होता; मात्र यादरम्यान असे काही घडले ज्याचा अंदाज अक्षयलादेखील आला नाही. 

होय, अक्षयने नितारासोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, दोघांचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अक्षयने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, Daddy's day out gone wrong #p[ParentLife! याचा अर्थ ‘डॅडी आपल्या मुलीला घेऊन बाहेर फिरण्यासाठी गेले मात्र सर्व काही उलटे घडले... पॅरेंट्सचे आयुष्य आहे.’ आता या व्हिडिओमध्ये नेमके काय आहे, याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 
 

व्हिडीओमध्ये अक्षयची चिमुकली नितारा झोक्यावर बसलेली असते; मात्र चुकून निताराचे पाय अक्षयच्या चेहºयावर लागतात. मग काय अक्षय कसाबसा स्वत:ला सावरतो. खरं तर अक्षय त्याच्या चिमुकलीला कदाचित खेळवत असेल असेच व्हिडीओ बघून वाटते. असो, अक्षय स्वत: खिलाडी असून, आपल्या मुलीला जर तो अशाप्रकारचे प्रशिक्षण देत असेल तर ते स्वाभाविक आहे. दरम्यान, अक्षयने हा व्हिडीओ अपलोड करताच त्याला एक मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अक्षयच्या चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडत आहे. 

या व्हिडीओचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये अक्षयच्या मुलीचा चेहरा दिसत नाही. वास्तविक अक्षयने मुुलीसोबतचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. परंतु दोन्ही व्हिडीओमध्ये निताराचा चेहरा दिसत नाही. खरं तर अक्षय आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना दोघेही निताराला नेहमीच माध्यमांपासून दूर ठेवतात.  दोघेही निताराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. परंतु त्या फोटोंमध्ये तिचा चेहरा कधीच स्पष्ट नसतो.



अक्षयला नुकतेच मुंबई महानगरपालिकेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. त्याचबरोबर तो ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटामध्येही व्यस्त आहे. पुढच्या महिन्यापासून तो या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करणार आहे. तो नुकताच या लंडन येथून परतला आहे. 

Web Title: Akshay Kumar's daughter is under the influence of daughter Nitara, see video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.