अक्षय कुमारच्या ‘या’  हिरोईनने दिला कन्येला जन्म, फोटो शेअर करत सांगितले नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 13:40 IST2019-09-02T13:38:25+5:302019-09-02T13:40:42+5:30

आमच्या कुटुंबात एका नव्या सदस्याचे स्वागत करताना मला अभिमान वाटतोय.गत 31 ऑगस्टला आमच्या घरी एका परीने जन्म घेतला, असे तिने लिहिले.

akshay kumars co-star bruna abdullah become a mom of a baby girl | अक्षय कुमारच्या ‘या’  हिरोईनने दिला कन्येला जन्म, फोटो शेअर करत सांगितले नाव

अक्षय कुमारच्या ‘या’  हिरोईनने दिला कन्येला जन्म, फोटो शेअर करत सांगितले नाव

ठळक मुद्देगतवर्षी 25 जुलैला दोघांनी साखरपुडा केला होता आणि याचवर्षी मे महिन्यांत लग्न केले होते.

अक्षय कुमारची को-स्टार ब्रूना अब्दुल्ला हिने एका गोंडस कन्येला जन्म दिला आहे. ब्रूनाने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली. एवढेच नाही तर मुलीचा फोटोही पोस्ट केला. तिचे नावही तिने सांगितले.
आमच्या कुटुंबात एका नव्या सदस्याचे स्वागत करताना मला अभिमान वाटतोय. गत 31 ऑगस्टला आमच्या घरी एका परीने जन्म घेतला. आम्ही तिचे नाव इसाबेल ठेवले आहे, असे तिने लिहिले.


ब्रूना व तिचा पती एलन यांनी मुलीच्या जन्माआधीच तिच्या स्वागताची तयारी सुरु केली होती. आपल्या बाळासाठी त्यांनी स्पेशल नर्सरी डिझाईन केली होती.


ब्रूनाने आय हेट लव्ह स्टोरी, ग्रँड मस्ती या चित्रपटांत काम केले आहे. ब्रूना चित्रपटांशिवाय ‘खतरों के खिलाडी’, ‘नच बलिए 6’ आणि ‘कॉमेडी क्लासेस’ यासारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकलेली आहे. 2007 मध्ये ‘कॅश’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता.  अक्षय कुमार व जॉन अब्राहमच्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील ‘सुबह होने ना दे’ या सुपरहिट गाण्यातही ती झळकलेली आहे. या गाण्यामुळे ब्रूनाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. 
प्रेग्नंसीनंतर ब्रूनाने बॉयफ्रेन्ड एलनसोबत लग्न केले होते.

तिच्या प्रेग्नंसीनंतर वेगवेगळी चर्चा सुरु झाली होती. ब्रूना विवाहित आहे की नाही,याचीही चर्चा रंगली होती. याचकाळात ब्रूनाने आपल्या लग्नाचा फोटो शेअर करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ब्रूनाचा पती एलन हा स्कॉटिश आहे.

गतवर्षी 25 जुलैला दोघांनी साखरपुडा केला होता आणि याचवर्षी मे महिन्यांत लग्न केले होते.

Web Title: akshay kumars co-star bruna abdullah become a mom of a baby girl