कधी जीभ तर कधी चॉकलेट दाखवून मीडियावर भडकली अक्षय कुमारची चिमुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 16:05 IST2017-01-24T10:35:54+5:302017-01-24T16:05:54+5:30

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार पत्नी ट्ंिवकल खन्ना, मुलगी नितारा आणि मुलासोबत मुंबईतील बांद्रा परिसरात बघावयास मिळाले होते. एकत्र आलेला ...

Akshay Kumar's chimukulake shows the tongue and sometimes chocolate | कधी जीभ तर कधी चॉकलेट दाखवून मीडियावर भडकली अक्षय कुमारची चिमुकली

कधी जीभ तर कधी चॉकलेट दाखवून मीडियावर भडकली अक्षय कुमारची चिमुकली

ही दिवसांपूर्वी अक्षय कुमार पत्नी ट्ंिवकल खन्ना, मुलगी नितारा आणि मुलासोबत मुंबईतील बांद्रा परिसरात बघावयास मिळाले होते. एकत्र आलेला हा परिवार अतिशय मूडमध्ये दिसत होता. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळेस अक्षय आणि ट्ंिवकलने मुलगी नितारा हिला मीडियापासून अजिबात लपविले नव्हते; मात्र निताराचा मीडियाच्या बाबतीत भलताच मूड बघायवास मिळाला. मीडियाचे कॅमेरे बघताच निताराने तिच्याजवळ असलेले चॉकलेट चेहºयासमोर घेत जणू काही मीडियावर संताप व्यक्त केला. 



यापूर्वीदेखील मुंबई एअरपोर्टवर निताराने मीडियाचे कॅमेरे बघताच त्यांना जीभ दाखवित चिडवले होते. यावेळेस तिने चॉकलेट दाखवित राग व्यक्त केल्याने मीडियावाल्यांच्या चेहºयावर हसू तर उमटलेच शिवाय निताराचा हा अंदाज त्यांना जबरदस्त भावला. मग काय निताराचे या रागीट आणि क्यूट अंदाजातील फोटो क्लिक करण्यासाठी सगळे कॅमेरे तिच्या दिशेने वळाले. आपल्या लेकीची ही कृती मात्र अक्षय आणि ट्ंिवकललाही आवडली. त्यांनी हसत-हसत तिला जवळ केले. 



नितारा आतापासूनच मीडियापासून दूर राहण्याचा नेहमीच प्रयत्न करीत आली आहे. तिला जणू काही कॅमेºयांची अ‍ॅलर्जीच आहे. मीडियावाल्यांनी तिच्याकडे कॅमेरे केले की ती अशी काही भडकून जातेय की बघणारे दंग होतात. अक्षय तर तिच्या या कृतीवर खूपच फिदा आहे. तिचा हा अंदाज त्याला खूपच भावतो. ट्ंिवकललादेखील तिची ही स्टाईल आवडते. 

Web Title: Akshay Kumar's chimukulake shows the tongue and sometimes chocolate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.