Bhooth Bangla OTT Release : अक्षय कुमारचा 'भूत बंगला' OTT वर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 14:38 IST2026-04-08T14:37:19+5:302026-04-08T14:38:38+5:30
अक्षय कुमारचा 'भूत बंगला' चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Bhooth Bangla OTT Release : अक्षय कुमारचा 'भूत बंगला' OTT वर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार?
Bhooth Bangla OTT Release : बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची जोडी तब्बल १४ वर्षांनंतर 'भूत बंगला' (Bhoot Bangla) या चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक करत आहे. एप्रिल २०२६ मधील हा सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपट मानला जात आहे. नुकताच ६ एप्रिल रोजी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला. आता चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
'भूत बंगला' हा चित्रपट आधी १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, सध्या बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर २' (Dhurandhar 2) या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे निर्मात्यांनी 'भूत बंगला'चे प्रदर्शन एक आठवडा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता हा चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. तर १६ एप्रिल रोजी या चित्रपटाचे 'पेड प्रिव्ह्यूज' पार पडतील.
OTT वर कधी आणि कुठे दिसणार?
चित्रपटगृहातील प्रदर्शनानंतर हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार, याची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. चित्रपटाच्या पोस्टरनुसार, 'भूत बंगला'चे डिजिटल हक्क 'Netflix' या प्लॅटफॉर्मने खरेदी केले आहेत. साधारणपणे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ४५ ते ६० दिवसांनी तो OTT वर उपलब्ध होतो. त्यानुसार, जून २०२६ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षक हा चित्रपट घरबसल्या नेटफ्लिक्सवर पाहू शकतील.
दिग्गज कलाकारांची मांदियाळी
प्रियदर्शन यांच्या या चित्रपटात अक्षय कुमार आणि तब्बू यांच्यासोबतच परेश रावल, राजपाल यादव, असराणी, वामिका गब्बी आणि मिथिला पालकर असे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. एकता कपूर आणि अक्षय कुमार यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची पटकथा प्रियदर्शन, रोहन शंकर आणि अभिलाष नायर यांनी लिहिली आहे.