अक्षय कुमार बनणार विलेन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 00:33 IST2016-01-16T01:09:18+5:302016-02-13T00:33:25+5:30
अक्षय कुमार हा बॉलीवूडचा खराच खिलाडी आहे. 'रोबोट २' मध्ये त्याला विलेनच्या भूमिकेसाठी निवडले आहे. हाच चित्रपट तमिळमध्ये 'एन्थ्रिन ...
.jpg)
अक्षय कुमार बनणार विलेन!
अ ्षय कुमार हा बॉलीवूडचा खराच खिलाडी आहे. 'रोबोट २' मध्ये त्याला विलेनच्या भूमिकेसाठी निवडले आहे. हाच चित्रपट तमिळमध्ये 'एन्थ्रिन 2' म्हणून प्रदर्शित होईल. या चित्रपटात तामिळनाडूचा सिनेमा आयकॉन रजनीकांत एमी जॉक्सनसोबत दिसेल. 'एन्थ्रिन 2' हा सध्या भारतातील सर्वांत जास्त महागडा चित्रपट आहे. आमीर खानला या चित्रपटासाठी खलनायकाच्या भूमिकेत निवडणार अशी अफवा होती. पण, नंतर 'टर्मिनेटर' स्टार अर्नाेल्डला निवडले. त्याला विलेन म्हणून यात कास्ट करण्यात आले. सुत्रांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी अर्नी सोबत झालेल्या बातचीतनंतर तिथे असलेल्या पेपरवर्कमध्ये टीम बिझी आहे. अक्षय, दिग्दर्शक शंकर आणि संपूर्ण टीम ही चैन्नईला पूजेसाठी गेली आहे. अक्षयला रजनीकांतसोबत भेट झाल्यावर कसे वाटले विचारले गेल्यावर त्याने उत्तर देण्यास नकार दिला.